ठाण्यातील एमडी तस्करी प्रकरण: आरोपीला आता नाशिक पोलीस करणार अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 08:02 PM2018-01-09T20:02:49+5:302018-01-09T20:08:20+5:30

ठाण्यातून एमडी पावडरची तस्करी करणा-या अक्रम खान याच्याविरुद्ध नाशिकमध्येही मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली. यात त्याला नाशिक पोलीस ठाणे कारागृहातून ताब्यात घेणार आहेत.

Thane's MD trafficking case: Nashik police arrested the accused now and arrested | ठाण्यातील एमडी तस्करी प्रकरण: आरोपीला आता नाशिक पोलीस करणार अटक

ठाणे पोलीस दुस-यांदा मध्यप्रदेशात

Next
ठळक मुद्दे भोलाच्या शोधासाठी ठाणे पोलीस दुस-यांदा मध्यप्रदेशातआणखीही धागेदोरे मिळण्याची शक्यताआतापर्यंत तिघांना अटक

ठाणे : ठाण्याच्या नितिन कंपनीजवळ एमडी (मेफेड्रॉन) पावडरच्या तस्करीप्रकरणी पकडलेल्या अक्रम असलम खान याच्यावर नाशिकमध्ये मोक्कांतर्गत कारवाई होणार आहे. त्याच कारवाईसाठी नाशिकच्या मुंबईनाका पोलीस ठाण्याचे पथक त्याला लवकरच ठाणे न्यायालयामार्फत ताब्यात घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्यातून नाशिकमध्ये १६ लाख ४४ हजारांची ८२२ ग्रॅम एमडी पावडरची तस्करी करतांना अक्रमला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणावरे, उपनिरीक्षक शिवराज बेंद्रे, श्रीनिवास तुंगेनवार आदींच्या पथकाने ३ जानेवारी रोजी अटक केली होती. या प्रकरणात त्याला ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. सोमवारी तिची मुदत संपल्यानंतर ठाणे न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. अक्रमने रईस शेख आणि अजय जाधवन यांच्याकडून एमडी पावडरची खरेदी केल्याची माहिती मिळाल्यानंतर या दोघांनाही ठाणे पोलिसांनी ६ जानेवारी रोजी मध्यप्रदेशातील इंदोर येथून अटक केली. त्यांनी ही पावडर मध्यप्रदेशातील भोला या एमडी विक्रेत्याकडून आणल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांचे एक पथक त्याला शोधण्यासाठी मध्यप्रदेशात गेले होते. मात्र तो हाती लागला नाही. दरम्यान, अक्रमविरुद्ध नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल असून मुंबईनाका पोलीस ठाण्यातही त्याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई झाली आहे. मात्र तो यात फरार आहे. आता याच कारवाईसाठी त्याचा ठाणे न्यायालयामार्फत नाशिक पोलीस ताबा घेणार आहेत. तर भोलाचा शोध घेण्यासाठी ठाणे पोलीस पुन्हा मध्यप्रदेशात रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याला अटक केल्यानंतर एमडी प्रकरणातील आणखी धागेदारे हाती लागण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Thane's MD trafficking case: Nashik police arrested the accused now and arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.