ठाणेच्या स्काऊट-गाईड विद्यार्थ्यांच्या राहुटय़ा दोन दिवसांपासून उल्हासनदीच्या परिसरात
By सुरेश लोखंडे | Published: February 2, 2018 08:18 PM2018-02-02T20:18:36+5:302018-02-02T20:23:21+5:30
जिल्ह्यातील विविध शाळांमधील सुमारे ४०० पेक्षा अधिक स्काऊट्स गाईडच्या विद्यार्थ्यांसह सुमारे ५५ शिक्षकांचे जिल्हास्तरीय कॅम्प आयोजित केला. कल्याण तालुक्यातील वरपगांव येथील सेक्रेड हर्ट स्कूलच्या डोंगरमाथ्याच्या पायथ्याशी जिल्हा भरातील स्काऊट्स, गाईड्स नदी परिसरातील थंडीच्या गारव्यात चार दिवशीय जिल्हा कॅम्पमध्ये सहभागी झाले आहेत.
ठाणे : येथील भारत स्काऊट्स गाईड्स जिल्हा संस्था, ठाणे यांनी जिल्ह्यातील विविध शाळांमधील सुमारे ४०० पेक्षा अधिक स्काऊट्स गाईडच्या विद्यार्थ्यांसह सुमारे ५५ शिक्षकांचे जिल्हास्तरीय कॅम्प आयोजित केला आहे. सुमारे दोन दिवसापासून सध्याच्या या गुलाबी थंडीत विद्यार्थ्यांसह शिक्षक रात्रंदिवस राहुटीमध्ये वास्तव्यास राहून उल्हासनदी परिसरातील निसर्ग सैदर्याचा लाभ घेत आहेत.
कल्याण तालुक्यातील वरपगांव येथील सेक्रेड हर्ट स्कूलच्या डोंगरमाथ्याच्या पायथ्याशी जिल्हा भरातील स्काऊट्स, गाईड्स नदी परिसरातील थंडीच्या गारव्यात चार दिवशीय जिल्हा कॅम्पमध्ये सहभागी झाले आहेत. गटागटात विभागलेले विद्यार्थ्यांनी स्वत: राहुटी तयार करून आपल्या वास्तव्याची व्यवस्था केली आहेत. जंगल परिसरात वास्तव्यास राहून या कॅम्पमध्ये स्वावलंबनासह विविध धडे घेत आहेत. या चार दिवशीय कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांना पहाटेपासून विविध कार्यक्रमात सहभागी करून घेत अनोखा अनुभव प्राप्त करून दिला जात आहे.
शहरातील सिमेंटच्या रस्त्यांवर, वाहनांवर फिरणारा विद्यार्थी या कॅम्पमध्ये येऊन मातीच्या सहवासातील अनुभव घेऊन इतरांपुढे आदर्शन घालून देत असल्याचे प्रतिपादन ठाणे भारत स्काऊट-गाईडचे अध्यक्ष केदार जोशी, यांनी या प्रसंगी घेतलेल्या कार्यक्रमाप्रसंगी केले. तर सतत दैनंदिन जीवन वातानुकुलित घरासह वर्गात घालणारे शहरी विद्यार्थी निसर्गाच्या या सानिध्यात येऊन जीवनातील मोठा अनुभव प्राप्त करीत जीवन समृध्द करीत असल्याचे मार्गदर्शन स्काऊट-गाईडचे जिल्हा मुख्य आयुक्त अशोक मिसाळ यांनी केले. तर शहरात वास्तव्यास असलेल्याना गरज असलेल्या डी व्हिटामीन मिळवण्यासाठी शुध्द हवामानातील कोवळ्या उन्हाची गरज आहे. त्यासाठी या सारखे कॅम्ल लावून सुदृढ व निरोगी आरोग्य ठेवण्याची गरज सेक्रेड हर्ट स्कूलचे सीईओ अल्बीन अॅन्थोनी यांनी व्यक्त केली. यावेळी शिक्षक परिषदेचे वेणु कडू यांच्यासह अन्यही मान्यवरांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे जिल्हा संघटक संतोष दुसाने, निझार विराणी, केशव चौधरी, आदींसह शिक्षकांकडून विद्यार्थ्यांची रात्रंदिवस काळजी घेत आहेत.