सीडीरेशो मॅच होत नसल्यामुळे ठाणेच्या टीडीसीसी बँक सुस्थितीत नसल्याची खंत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 07:16 PM2018-09-16T19:16:21+5:302018-09-16T19:23:25+5:30
टीडीसीसी बँकेला ३० कोटींचा नफा झाल्याचे सुतोवाच बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी केले. त्यावर बोलताना पाटील यांनी बँकेच्या सहा हजारांच्या ठेवी असल्याचे अधिकाऱ्यांच्या तोंडून वळवून घेतले. कर्ज दोन हजार २२ कोटींचे दिल्याचे समजून घेतले. यावर मात्र पाटील यांनी संचालक मंडळासह अधिकाऱ्यांची शाळा घेत सांगितले, की बँक सुस्थितीत असण्यासाठी ठेवीच्या ५० टक्केपेक्षा जास्त कर्ज पुरवठा होणे अपेक्षित असल्याचे स्पष्ट केले.
ठाणे : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेचा कर्ज पुरवठा ठेवींच्या ५० टक्के पेक्षा कमी झालेला आहे. यामुळे बँकेचा सीडीरेशो मॅच होत नाही. यावरून बँक आर्थिक सुस्थितीत आहे, असे म्हणता येत नसल्याची खंत या बँकेचे माजी अध्यक्ष खासदार कपील पाटील यांनी व्यक्त करून बँकेच्या संचालक मंडळासह अधिकाऱ्यांना ६० व्या वार्षिक सभेत चांगल्याच कान पिचक्या देत मार्गदर्शनही केले.
येथील गडकरी रंगायतनमध्ये मंगळवारी बँकेची वार्षिक बैठक पार पडली. त्यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करीताना पाटील यांनी बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा देखील घेतला. टीडीसीसी बँकेला ३० कोटींचा नफा झाल्याचे सुतोवाच बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी केले. त्यावर बोलताना पाटील यांनी बँकेच्या सहा हजारांच्या ठेवी असल्याचे अधिकाऱ्यांच्या तोंडून वळवून घेतले. कर्ज दोन हजार २२ कोटींचे दिल्याचे समजून घेतले. यावर मात्र पाटील यांनी संचालक मंडळासह अधिकाऱ्यांची शाळा घेत सांगितले, की बँक सुस्थितीत असण्यासाठी ठेवीच्या ५० टक्केपेक्षा जास्त कर्ज पुरवठा होणे अपेक्षित असल्याचे स्पष्ट केले. बँकेने केलेला कर्ज पुरवठा आणि ठेवी यांचा सीडीरेशो ५० टक्के पेक्षाही कमी आहे. सीडीरेशो मॅच होत नसल्यामुळे बँक सुस्थितीत आहे, असे म्हणता येत नसल्याची खंत पाटील यांनी व्यासपीठावर व्यक्त केली.
बँके सुस्थितीत ठेवण्यासाठी ठेवींच्या ५५ ते ६० टक्के कर्ज पुरवठा करावा लागेल. तेव्हा सीडीरेशो मॅच होईल आणि बँक सुस्थितीत येईल अन्यथा बँक कोणत्याही क्षणी घाट्यात येण्याची शक्यता पाटील यांनी व्यासपीठावरून व्यक्त केली. शेतकऱ्यांची बँक असून शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणात कर्ज पुरवठा होत नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्याऐवजी सांगलीला कर्ज पुरवठा होत असल्याची बाबही पाटील यांनी उघड केली. बँकेने ४१ हजार लाख रूपयांचा कर्ज पुरवठा केल्याचे दिसून येत आहे. पण हा कर्ज पुरवठा पगार तारणावर केलेला आहे. त्यातून ३० कोटींचा नफा झालेला आहे. पण शेतकऱ्यांची बँक असून केवळ पगार तारणावरच कर्ज पुरवठा करण्याची मानसिकता आता बदला. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी त्यांना कर्ज पुरवठा करा. तरूणांनाकडे लक्ष र्केंद्रीत करून दहा - दहा जणांच्या गृपच्या शेतीसाठी त्यांना तयार करा. त्यांच्या हाताला रोजगार द्या. भूमिपुत्रांना एकत्र करून त्यांचे दुधाचे प्लॅट उभे करण्याचे मार्गदर्शन पाटील यांनी यावेळी केले. यावेळी काही उपस्थितानी जास्त एनपीए प्रोहिजन केल्याच्या आरोपासह पतसंस्था वाचवा, मानधनाचा विषय नफ्याच्या वाटणीत येत नाही, इंडस्ट्रियल रिटर्न आदीं आरोपांसह आयत्यावेळी आलेल्या प्रश्नांना अध्यक्षांसह अधिकाऱ्यांनी उत्तरे देऊन उपस्थितांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला.