ठाण्यातील ब्रह्मांड कट्ट्यावर रंगले मायबोलीचे प्रेमतरंग, प्रेक्षकांची मिळाली भरभरुन दाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 04:20 PM2018-02-20T16:20:46+5:302018-02-20T16:23:18+5:30

ब्रह्मांड कट्ट्यावर मायबोली मराठी साहित्य रसिक मंडळ ब्रह्मांड प्रस्तुत प्रेमतरंग हा कार्यक्रम सादर झाला. 

Thanhane's universe shrouded in love with love, attracted audience attention | ठाण्यातील ब्रह्मांड कट्ट्यावर रंगले मायबोलीचे प्रेमतरंग, प्रेक्षकांची मिळाली भरभरुन दाद

ठाण्यातील ब्रह्मांड कट्ट्यावर रंगले मायबोलीचे प्रेमतरंग, प्रेक्षकांची मिळाली भरभरुन दाद

googlenewsNext
ठळक मुद्दे प्रेमाचे विविध रंग उलगडणारा प्रेमतरंग कार्यक्रम संपन्न प्रेमाचे १२ अविष्कार सादरब्रह्मांड कट्ट्याचे संस्थापक राजेश जाधव यांनी केले आभार प्रदर्शन

ठाणे: ठाण्यातील ब्रह्मांड कट्ट्यावर रविवारी सांज स्नेह सभागृहात मराठी साहित्य रसिक मंडळाने बनविलेला प्रेमाचे विविध रंग उलगडणारा प्रेमतरंग कार्यक्रम संपन्न झाला. 
   या कार्यक्रमात मातृप्रेम, पितृप्रेम, बंधु, भगिनीप्रेम, गुरु-शिष्याचे प्रेम, अल्लड प्रेम, प्रियकर-प्रेयसीचे प्रेम, पती - पत्नी, निसर्ग, समाजप्रेम, राष्ट्र - भक्ती प्रेम आणि वैश्विक प्रेम असे जीवनाच्या वेगवेगळ््या टप्प्यावर अनुभवास येणाºया प्रेमाचे १२ अविष्कार सादर करण्यात आले. हे सर्व काव्यवाचन, लेख, नाट्य, कथाकथन, नाट्य अभिवाचन, नृत्याभिनय या विविध प्रकारांनी दाखविण्यात आले आणि कार्यक्रमाची रंगत वाढली. या सादरीकरणात प्रेमा तुझा रंग कसा या नाटकातील एक खुसखुशीत नाट्य प्रवेशाचे अभिवाचन अशोक धोपेश्वरकर आणि मीनल कुलकर्णी या दोघांनी केले. यातून पती पत्नीच्या प्रेमाने रसिकांवर भुरळ घातली. ज्योती शहाणे यांच्या राधा कृष्ण प्रेमावरील कविता वाचनावर जादूगार मधुगंधा यांनी अप्रतिम नृत्याविष्कार सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले. अरुण दळवी यांनी सादर केलेली बाप कविता प्रेक्षकांना खुपच भावली तर तुळ््या गळा माझ्या गळा हे गीत बंधू भगिनींचे प्रेम सुखावणारे होते. सुनिता पेंडसे व सुनिला वैद्य यांनी बाबा आमटे यांचे समाजसेवेचे प्रेम, कवी महानोर यांचे निसर्ग प्रेम सादर केले तर शामची आई नाट्य प्रवेश मनात घर करुन गेले. सदर कार्यक्रमात अशोक धोपेश्वरकर, अरुण दळवी, विद्या जोशी, ज्योती दोंदे, वर्षा गंद्रे, मधुगंधा काटकर, सुहासिनी भालेराव, मिनल कुलकर्णी, सुनिता पेंडसे, सुनीला वैद्य, वैशाली जोशी, सुधा कुडी, सुनीता हरकारे, वंदना शनवारे, सुषमा ताम्हाणे, छाया धोपेश्वरकर या सभासदांनी भाग घेतला होता. कार्यक्रमास प्रेक्षकांची उत्तम दाद मिळाली. स्वाती चव्हाण, अमृता प्रधान, सुवर्णा जोशी, संगीता कुलकर्णी यांनी निवेदनाची बाजू सांभाळली. मायबोलीच्या अध्यक्षा ज्योती शहाणे यांनी समारोपात अल्लड प्रेमाचे सादरीकरण करुन कार्यक्रमाचा कळस तयार केला. ब्रह्मांड कट्ट्याचे संस्थापक राजेश जाधव यांनी आभार प्रदर्शन केले. गीता पालवनकर यांच्या हस्ते सर्व कलाकारांना प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन सन्मानित केले. 

Web Title: Thanhane's universe shrouded in love with love, attracted audience attention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.