... आणि त्या आशा सेविकांनी मानले सिव्हिल रुग्णालयाचे आभार

By अजित मांडके | Published: February 10, 2024 03:50 PM2024-02-10T15:50:29+5:302024-02-10T15:50:36+5:30

वाढत्या उष्म्यात विविध मागण्यासाठी आशा स्वयंसेविकांचा मोर्चा ठाण्यात येत असताना,  वाटेत अनेक आशा स्वयंसेविकांची तब्येत ढासळली.

thanks to the Civil Hospital the Asha Seviks took that hope rally mantralaya | ... आणि त्या आशा सेविकांनी मानले सिव्हिल रुग्णालयाचे आभार

... आणि त्या आशा सेविकांनी मानले सिव्हिल रुग्णालयाचे आभार

ठाणे : वाढत्या उष्म्यात विविध मागण्यासाठी आशा स्वयंसेविकांचा मोर्चा ठाण्यात येत असताना,  वाटेत अनेक आशा स्वयंसेविकांची तब्येत ढासळली. यापैकी सहा आशा स्वयंसेविकांना चक्कर, रक्तदाब शुगर, श्वास घ्यायला त्रास वाढल्याने भिवंडी उपजिल्हा रुग्णालयातून ठाणे सिव्हील रुग्णालयात दाखल केल्यावर त्वरित सेविकांवर औषधोपचार केले, त्यांच्या तब्येतीत कमालीची सुधारणा झाल्याने रुग्णालयाचे सेविकांनी आभार मानले आहेत.

आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांचा शहापूर ते मंत्रालय पदयात्रा मोर्चा ठाण्याकडे येत असताना, भिवंडी परिसरात अनेक आशा स्वयंसेविका चालताना त्रास झाला. यापैकी गुरुवारी १८ आशा स्वयंसेविका उपचारासाठी भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी सहा जणींची तब्येत थोडी अधिक बिघडल्याने  शुक्रवारी तात्काळ ठाणे सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान रुग्णालयाने वेळीच योग्य उपचार केल्याने त्यांच्या प्रकृतीत कमालीची सुधारणा झाली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.

सिव्हिल रुग्णालयात दाखल झालेल्या आशा स्वयंसेविकाना रक्तदाब, चक्कर,  शुगर, श्वास घ्यायला त्रास होत होता. यापैकी एक दोघी मोर्चात बेशुद्ध झाले असल्याचे आशा स्वयंसेविकानी सांगितले. मात्र सिव्हिल रुग्णालयात सर्वतोपरी काळजी घेतली गेली. सोनोग्राफी, रक्त तपासणी बरोबर उपचार चांगले केले असल्याची माहिती आशा स्वयंसेविकानी दिली.

आशा स्वयंसेविकाच्या मोर्च्यात वाटेत कोणाला त्रास झाला तर त्यांच्या उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयाचे आरोग्य पथक तैनात होते. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे , सर्जन डॉ. निशिकांत रोकडे, डॉ. आळसपुरकर आणि कर्मचाऱ्यांनी चांगले काम केलं आहे. आशा स्वयंसेविकांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून लवकरच त्यांना घरी सोडले जाईल.
डॉ. कैलास पवार
(जिल्हा शल्य चिकित्सक ठाणे)

सिव्हिल रुग्णालयात आमची चांगली सुश्रुषा केली आहे. एखाद्या मोठ्या खाजगी रुग्णालयात देखभाल करतात तशी उत्तम सोय केली होती. इथल्या डॉक्टर आणि कर्मचारी मोठ्या आस्थेने उपचार करत होते.
जयश्री धनगर
(आशा स्वयंसेविका, मीठपाडा भिवंडी)

Web Title: thanks to the Civil Hospital the Asha Seviks took that hope rally mantralaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे