आदित्य ठाकेरांचा तो कॉमेडी शोच; नरेश म्हस्के यांची गंभीर टिका
By अजित मांडके | Published: February 19, 2024 04:34 PM2024-02-19T16:34:35+5:302024-02-19T16:35:09+5:30
आदित्य ठाकरे यांचा ठाण्यात कॉमेडी शो होता, यापुढे त्यांना नकाला करणे हाच एकमेव उद्योग राहणार आहे. दुसरे
अजित मांडके, ठाणे : आदित्य ठाकरे यांचा ठाण्यात कॉमेडी शो होता, यापुढे त्यांना नकाला करणे हाच एकमेव उद्योग राहणार आहे. दुसरे काहीच काम त्यांच्याकडे शिल्लक राहणार नाही म्हणून ते तमाशा मधील विदुषकाप्रमाणे काम करीत असून लोकांना हसविण्याचे काम करीत असल्याची टिका शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्यावर केली आहे.
रविवारी आदित्य ठाकरे यांनी ठाण्यातील विविध शाखांना भेटी दिल्या. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान करीत राजीनामा द्या, मी ठाण्यातून लढतो असे थेट आव्हान दिले. त्यानंतर या संदर्भात सोमवारी म्हस्के यांनी आदित्य यांच्यावर गंभीर टिका केली. एक पात्र असते, त्या नाच्या म्हणत नाही, त्या पात्राचे काम असते लोकांना हसवणे ते काम त्यांनी केले. पक्षाची वाताहत झालेली आहे, जे शिल्लक राहिलेले आहेत, ते देखील परतीच्या मार्गावर आहेत, त्यामुळे आधी घर सांभाळा मग आव्हान द्या असेही ते म्हणाले. ठाण्यात त्यांनी केवळ एक नक्कल करण्यापलिकडे काहीच केले नसून तो एक कॉमेडी शो होता, अशी टिकाही त्यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर बोलण्या इतके आपण तेवढे मोठे झालेला नाहीत, याचीही आठवण म्हस्के यांनी करुन दिली. आधी पुरषांच्या आवाजात बोला नंतर आव्हान द्या, असेही ते म्हणाले.
आधी तुम्हाला खासदार शिंदे यांनी कल्याणचे आव्हान दिले आहे, ते तरी आधी स्विकारा आणि निवडणुका लागल्यावर या समोरा समोर मग बघूया आव्हान कोणाचे आहे, ते स्वत: ज्या ठिकाणी राहतात, तो मतदार संघ सोडून वरळी सारख्या सुरक्षित मतदार संघाची निवड केली. आता परत सुरक्षित मतदार संघ शोधत असल्याचीही टिका त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा मागण्याआधी तुम्ही आमदाराकीचा राजीनामा देतो सांगितले दिला राजीनामा का? असा सवालही त्यांनी केला. रविवारी झालेल्या तीन ते चार ठिकाणांच्या कार्यक्रमात तीच तीच माणसे दिसत होती. बाहेरचे उसणे आवासन कशाला आणता. म्हस्के यांनी शिंदे यांनीच आमदारकीचे तिकीट नाकारले होते, अशी टिकाही आदीत्य यांनी केली होती. त्यावर म्हस्के यांनी प्रतिउत्तर देत आमचा आमच्या माणसावर विश्वास आहे, आमच्यात भांडणे लावण्याचा प्रयत्न करु नका, पदासाठी आम्ही शिंदे सोबत नाही.
शिवसैनिकांची बाजू घेणारा, त्यांच्या मागे उभा राहणारा, बाळासाहेबांचे विचार अंगीकारलेला माणूस असल्याने आम्ही शिंदे यांच्या सोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आमच्यात गैरसमज करण्याचा प्रयत्न करु नका आमच्यात भांडणे लावण्याचे काम करु नका आम्ही ते करणारही नाही असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे हे सहानभुती घेत असल्याच्या मुद्यावर म्हस्के यांना छेडले असता, वर्षा सोडल्यापासून सहानभुती कोण घेत आहे, त्याचा प्रयत्न कोण करतेय, असा सवालही त्यांनी केला. इलाका हमारा धमाका हमारा होंगा, असे म्हणणाऱ्यांनी आधी ठाण्यात किती लोक तुमच्या बरोबर आहेत याचे आत्मपरिक्षण करावे आणि हा तुमचा नाही, धर्मवीर आनंद दिघे यांचा हा इलाका आहे, असल्याचेही त्यांनी आदित्य यांना सुनावले. ठाणे तुमचे म्हणताय मग नगरसेवक यांच्या सोबत का राहिले नाही, याचा विचार करावा, जे शिल्लक राहिले आहेत, ते देखील परतीच्या मार्गावर असल्याचा दावाही त्यांनी केला. त्यामुळे आपल्या सोबत कोण आहे, त्याचे आत्मपरिक्षण करा मग ठाण्यावर दावा करा असे आव्हानही त्यांनी दिले.