भावाची हत्या करणाऱ्या आरोपी भावास आजन्म कारावासाची शिक्षा
By धीरज परब | Published: April 6, 2023 04:46 PM2023-04-06T16:46:30+5:302023-04-06T16:46:42+5:30
भाईंदर पूर्व भागात २०१८ साली भावाने भावाच्या केलेल्या हत्येच्या गुन्ह्यात आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा ठाणे न्यायालयाच्या न्यायाधीश रचना तेहार यांनी सुनावली आहे.
मीरारोड - भाईंदर पूर्व भागात २०१८ साली भावाने भावाच्या केलेल्या हत्येच्या गुन्ह्यात आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा ठाणे न्यायालयाच्या न्यायाधीश रचना तेहार यांनी सुनावली आहे.
नवघर पोलीस ठाणे हद्दीत ४ ऑगस्ट २०१८ रोजी व्हिक्टर पात्राव रा. बेलनाथ कॉलनी, मालाड यांच्या फिर्यादी वरून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
काशी नगर च्या जय पांडुरंग कृपा मध्ये राहणारे त्यांचा सायमन यांने भाउ विल्फ्रेड पात्राव याच्या बँक खात्यातुन एटीएमव्दारे वीस हजार रुपये काढले . विल्फ्रेडने सायमनला पैसे का काढले ? अशी विचारणा केली असता त्यांच्यात भांडण झाले होते.
विल्फ्रेडने सायमनला मारण्याची धमकी दिल्याने चिडलेल्या सायमन याने विल्फ्रेड च्या छातीवर सुरीने वार करुन ठार केले होते. हत्या केल्यावर विल्फ्रेडचे मुंडके, डावा हात, दोन्ही हाताचे पंजे निर्घृणपणे धडा वेगळे करून प्लास्टीक पिशवीत बांधून संडासात लपवुन ठेवले होते.
पोलिसांनी त्यावेळी सायमन याला तात्काळ अटक केली होती. गुन्हयाचा तपास पूर्ण झाल्यानंतर तत्कालिन वरिष्ठ पोलीस निरिक्षक राम भालसिंग यांनी ठाणे जिल्हा न्यायालय, येथे दोषारोप पत्र दाखल केले होते.
आरोपी सायमन ह्याला दोषी ठरवून ५ एप्रिल रोजी न्यायाधीश रचना तेहरा यांनी हत्येच्या गुन्ह्यात दोषी ठरवुन आजन्म कारावास व ५ हजार रुपये दंड. दंड न भरल्यास सहा महिन्याची साधी कैद तसेच कलम २०१ मध्ये ३ वर्षे सश्रम कारावास व २ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.