येऊरच्या त्या सात बंगल्यांवर अखेर कारवाईला सुरवात, सात पैकी दोन बंगले जमीनदोस्त

By अजित मांडके | Published: September 25, 2023 07:13 PM2023-09-25T19:13:33+5:302023-09-25T19:16:02+5:30

सोमवारी दुपारी चारच्या सुमारास कारवाईला सुरवात झाली. त्यानंतर सांयकाळी उशीरापर्यंत सात पैकी २ बंगले जमीनदोस्त करण्यात आले.

The action has finally started on those seven bungalows of Your, two out of the seven bungalows are destroyed | येऊरच्या त्या सात बंगल्यांवर अखेर कारवाईला सुरवात, सात पैकी दोन बंगले जमीनदोस्त

येऊरच्या त्या सात बंगल्यांवर अखेर कारवाईला सुरवात, सात पैकी दोन बंगले जमीनदोस्त

googlenewsNext

ठाणे : येऊरच्या त्या सात बंगल्यावर अखेर ठाणे महापालिकेने कारवाई सुरु केली आहे. सोमवारी दुपारनंतर पोलीस बंदोबस्तात ही कारवाई सुरु करण्यात आली.  लोकायुक्तांकडे झालेल्या सुनावणीत महापालिकेला काही महत्वाचे आदेश देण्यात आले होते. परंतु त्यानंतर बंगलेधारकाने ठाणे जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. परंतु त्यांची याचिका फेटळाण्यात आली. त्यानंतर सोमवारी दुपारी चारच्या सुमारास कारवाईला सुरवात झाली. त्यानंतर सांयकाळी उशीरापर्यंत सात पैकी २ बंगले जमीनदोस्त करण्यात आले.

येऊर येथे ठाणे महापालिकेचे माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष सुरेश गडा यांनी उभारलेल्या सात बेकायदा बंगल्यांविरोधात सामाजिक कार्यकर्ते योगेश मुंधरा यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे याचिका दाखल केली होती. त्यानंतर लोकायुक्तांकडे देखील त्यांनी तक्रार केली होती. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या आणि पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या येऊरच्या जंगलात हे सात बंगले बांधण्यात आले आहेत. या बांधकामांबाबत तक्रारी करूनही पालिकेकडून त्याला संरक्षण दिले जात असल्याचा आरोप मुंदडा यांनी केला होता. याप्रकरणी त्यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे लोकायुक्तांकडे ११ नोव्हेंबर २०२२ मध्ये सुनावणी झाली होती. त्यानंतर नुकतीच या संदर्भात पुन्हा व्हिडोओ कानॅर्फन्सींगद्वारे सुनावणी झाली आहे.

या सुनावणीत विलंबाबात चौकशी करावी आणि विलंब झाला असल्याचे सिध्द झाल्यास संबंधितावर जबाबदारी निश्चित करण्याची कार्यवाही करावी असे लोकायुक्तांनी सांगितले होते. तसेच या बांधकामांवर कर कोणत्या आधारावर करण्यात आला, येतील बांधकाम नेमके कोणत्या कालावधीत झाले आहे? त्यातही तक्रारीत नमुद सात बंगल्याचे बांधकाम हे अनधिकृत असल्याचे सिध्द झाले असल्याने त्या बांधकामासंदर्भात पुढे काय करणार असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. त्यावर कारवाई करण्यात येणार आहे का? या संदर्भात एमआरटीपी अंतर्गत गुन्हे दाखल करुन या संदर्भातील एकत्रित अहवाल पुढील सुनावणी पूर्वी सादर करावा असे आदेश देण्यात आले होते. तसेच इको सेन्सिटीव्ह भुखंडावर भाडेकरु हक्क कसे प्रदान करण्यात आले याचा अहवाल देखील पुढील सुनावणी पूर्वी म्हणजेच १४ सप्टेंबर २०२३ पूर्वी सादर करावा असेही स्पष्ट करण्यात आले होते.

परंतु मधल्या काळात बंगलेधारकाने बांधकामांवर कारवाई टाळण्यासाठी ठाणे जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. परंतु त्यांची याचिका फेटाळण्यात आल्याने सोमवारी ठाणे महापालिकेच्या वर्तक नगर प्रभाग समितीच्या माध्यमातून दुपारी चार वाजता येथील बांधकामांवर कारवाईस सुरवात झाली. त्यानुसार सांयकाळी उशीरापर्यंत सातपैकी दोन बंगले जमीनदोस्त करण्यात आले.
 

Web Title: The action has finally started on those seven bungalows of Your, two out of the seven bungalows are destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.