राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते मद्यप्राशन करुन आले होते; मनसेच्या अविनाश जाधव यांचा गंभीर आरोप

By अजित मांडके | Published: November 8, 2022 07:44 PM2022-11-08T19:44:11+5:302022-11-08T19:44:26+5:30

मनसेने लावला हर हर महादेवचा मोफत शो, राष्ट्रवादीला दिले थेट आव्हान

The activists of NCP themselves had drunk alcohol; Serious allegations by MNS's Avinash Jadhav | राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते मद्यप्राशन करुन आले होते; मनसेच्या अविनाश जाधव यांचा गंभीर आरोप

राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते मद्यप्राशन करुन आले होते; मनसेच्या अविनाश जाधव यांचा गंभीर आरोप

googlenewsNext

ठाणे :  ‘हर हर महादेव’ हा मराठी चित्नपट पाहण्यासाठी आलेला प्रेक्षक हा मद्यप्रशासन करुन आला होता, हे तुम्ही ठरविणारे कोण? असा सवाल उपस्थित करीत राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते मद्यप्राशन करुन आले होते. त्यामुळेच त्यांची मारहाण करण्याची हिम्मत झाली असल्याचा आरोप मनसेचे ठाणो - पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला.

मनसेच्या वतीने  मंगळवारी सांयकाळी त्याच मॉलमध्ये मोफत शो लावत राष्ट्रवादीला आव्हान दिले. याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी येथे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुरवातीला एक स्क्रीन या सिनेमासाठी बुक करण्यात आली होती. मात्र प्रेक्षकांची गर्दी वाढल्याने तीन स्क्रीन येथे बुक करण्यात आल्या. त्यानंतरही सिनेमागृहाबाहेर प्रेक्षकांची गर्दी दिसून आली. परंतु आलेल्या प्रत्येक प्रेक्षकाला हा सिनेमा दाखविला जाईल असे आश्वासन यावेळी जाधव यांनी दिले. तर याठिकाणी मनसेचे देखील मोठय़ा संख्येने कार्यकर्ते हजर राहिल्याने त्यावर सवाल केला असता, अनुचित प्रकार घडू नये यासाठीच हे कार्यकर्ते हजर राहिल्याचेही जाधव यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे आमदार आव्हाड यांनी सोमवारी रात्नी १० वाजता विवियाना मॉल येथे आंदोलन करत प्रेक्षकांना बाहेर काढून हा शो बंद पाडला. यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिका:यांनी एका प्रेक्षकाला देखील मारहाण केल्याची घटना घडली. इतिहासाची मोडतोड करून हा चित्नपट दाखिवला जात असल्याचा आरोप यावेळी आव्हाड यांनी केला होता. परंतु त्यानंतर मनसेने हा शो पुन्हा सुरु केल्याचे दिसून आले.

या चित्रपटात नेमके काय आहे, हे प्रेक्षकांना सुध्दा कळू दे, त्यांना देखील उत्सुकता आहे, या चित्रपटात नेमके काय आहे, त्यामुळे आम्ही हा शो मोफत लावला असल्याची माहिती जाधव यांनी दिली. यावेळी दोन स्क्रीन या महिलांनी भरल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. इतिहास चुकीचा दाखविला असेल तर त्यांनी कोर्टात जावे, सेन्सार बोर्डकडे जावे अशी सुचनाही त्यांनी राष्ट्रवादीला केली. तर ज्या तरुणावर मद्यपी असल्याचा आरोप केला जात आहे, त्याचे सासरे लेखक आहेत, पत्नी पीएचडी होल्डर आहे. परंतु केवळ स्वत:ची कातडी वाचविण्यासाठी कोणाला तरी बदनाम करु नये असा सल्लाही त्यांनी दिला. जे काही व्हिडीओ टाकण्याचा प्रयत्न करीत आहात, जी काही बदनामी केली जात आहे, ती चुकीची असून, तुम्ही किती बदनाम आहात, हे माहित आहे, तुमचा इतिहासही किती बदनामीचा आहे, हे सांगण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका असा इशाराही त्यांनी दिला.

Web Title: The activists of NCP themselves had drunk alcohol; Serious allegations by MNS's Avinash Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.