श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून आंदोलन

By सुरेश लोखंडे | Published: September 27, 2024 09:14 PM2024-09-27T21:14:06+5:302024-09-27T21:14:14+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीसह प्रांगणात या श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करून त्यांच्या मागण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले.

The activists of Shramjivi Sangathan protested by entering Thane Collector's office | श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून आंदोलन

श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून आंदोलन

ठाणे : श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या आठ दिवसांपासून येथील कोर्टनाका चौकात बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. मात्र या कालावधीत त्यांच्या मागण्या समाधानकारक मान्य होत नसल्यामुळे संतापलेल्या या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी संध्याकाळी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत घुसून जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर त्यांनी विविध घोषणा देत आंदोलन केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीसह प्रांगणात या श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करून त्यांच्या मागण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे मुंबईला निवडणूक कामकाजाच्या बैठकीतसाठी मंत्रायात होते. यावेळी कार्यकत्यांनी त्यांच्या दालनासमोर, पायऱ्यांवर बसून टाळ, मृदुंग वाजवत, आंदाेलनाचे गाणे गात कार्यालय दणाणून सोडले. ठाणे जिल्ह्यातील तब्बल ४३ गाव पाड्यातील रहिवासी आणि वन पट्ट्यांचे दावेदार एक हजार ५२९ परिवार कुटुंबानी या बेमुदत आंदोलनात सहभाग घेतला आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असेल्या या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे संतापलेल्या या कार्यकर्त्यांनी श्रमजीवीचे जेष्ठ नेत बाळाराम भोईर यांच्या नेतृत्वाखाली या कार्यालयाच्या इमारतीत घुसून आंदोलन छेडले.

सेंट्रल मैदान व पोलीस कवायतीच्या मैदानाजवळील रस्त्यावर या कार्यकर्त्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. पण आजच्या आठव्या दिवशी संध्यकाही थेट जिल्हाधिकारी कायार्लयाच्या इमारतीत प्रवेश करून आंदोलन छेडल्यामुळे प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. पहिल्या दिवसापासून विश्राम गृाहाजवळील रस्त्यावर हे आंदोलन सुरू आहे. आंदोलक २५ ते ३० चुली पेटवून रस्त्यावरच जेवण तयार खात असत. त्यामुळे त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असे. याशिवाय प्रशासनाकडून त्यांच्या संपूर्ण मागण्यां गांभीर्याने घेतल्या नसल्याचा आरोप या आंदोलकांकडून केला जात आहे.

Web Title: The activists of Shramjivi Sangathan protested by entering Thane Collector's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे