पालिकेच्या फेरीवाला पथकांचे फेरीवाल्यांशी साटेलोटे प्रभाग अधिकाऱ्याच्या पाहणीत उघड

By धीरज परब | Published: January 18, 2023 08:18 PM2023-01-18T20:18:22+5:302023-01-18T20:18:39+5:30

मीरा भाईंदर महापालिकेने शहरातील रस्ते - पदपथ मोकळे रहावेत ह्यासाठी फेरीवाला पथकास बाउन्सर , सुरक्षा मंडळाचे जवान , वाहने देऊन देखील

The association of hawker teams of the municipality with the hawkers was revealed in the inspection of the ward officer | पालिकेच्या फेरीवाला पथकांचे फेरीवाल्यांशी साटेलोटे प्रभाग अधिकाऱ्याच्या पाहणीत उघड

पालिकेच्या फेरीवाला पथकांचे फेरीवाल्यांशी साटेलोटे प्रभाग अधिकाऱ्याच्या पाहणीत उघड

googlenewsNext

मीरारोड -

मीरा भाईंदर महापालिकेने शहरातील रस्ते - पदपथ मोकळे रहावेत ह्यासाठी फेरीवाला पथकास बाउन्सर , सुरक्षा मंडळाचे जवान , वाहने देऊन देखील फेरीवाल्यांवर कारवाई होत नसल्याचा प्रकार स्वतः प्रभाग अधिकाऱ्याने परस्पर पाहणी केल्यावर निदर्शनास आला. प्रभाग अधिकाऱ्या समोरच अतिक्रमण करणारे बाकडेवाले त्यांचे सामान गोळा करून नेट असताना देखील बाउन्सर व फेरीवाला पथक प्रमुख बघ्याच्या भूमिकेत पाहून प्रभाग अधिकारी सुद्धा आश्चर्य चकित झाले. 

भाईंदर पश्चिमेस रेल्वे स्थानक पासून मुख्य अश्या छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर तसेच डॉ . बाबासाहेब आंबेडकर ६० फूट मार्गावर मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यां मुळे रहदारी व वाहतुकीला अडथळा होतो .  फेरीवाल्यां मुळे या भागात नेहमीच मोठी वाहतूक कोंडी असते . ६० फूट मार्ग तर काँक्रीटचा बनवला असून त्यावर दोन्ही बाजूने फेरीवाल्यांचे बस्तान मांडलेले असून सायंकाळी तर हा महत्वाचा मार्ग फक्त एकदिशा करावा लागतो . 

६० फूट मार्गावर भाजीवाल्याना रस्त्याच्या दोन्ही कडेला रेषा मारून दिल्या असताना अनेकजण भर रस्त्यात बाकडे वा हातगाड्या लावतात . त्यातच खरेदीसाठी वा अन्य कामासाठी येणारे त्यांच्या दुचाकी भर रस्त्यात लावतात . शिवसेना गल्ली नाका परिसर तर वाहनकोंडीचा हॉटस्पॉट बनला आहे . यामुळे ध्वनी व वायू प्रदूषण देखील वाढते . दिवस रात्र फेरीवाल्यांचे रस्ते - पदपथावर अतिक्रमण असताना फेरीवाला पथक मात्र त्यांच्यावर सातत्याने ठोस कारवाई करताना दिसत नाही . फेरीवाल्यां कडून मोठ्या प्रमाणात अर्थपूर्ण साटेलोटे असल्याने कारवाई केली जात नसल्याचे आरोप नवीन नाहीत . हेच फेरीवाला पथक वरिष्ठांना मात्र आपण नियमित फिरून कारवाई करत असल्याचा कांगावा करत असतात . 

प्रभाग अधिकारी जितेंद्र कांबळे यांच्या कडे तक्रार आल्यावर त्यांनी मंगळवारी सायंकाळी परस्पर जाऊन ६० फूट मार्ग तसेच शिवसेना गल्ली नाका परिसराची पाहणी केली असता तेथे सर्रास रस्ते अडवून फेरीवाले मस्त मजेत बस्तान मांडून असल्याचे आढळून आले . त्याचे छायाचित्रण करून नंतर कांबळे यांनी फेरीवाला पथकास पाचारण केले . प्रभाग अधिकारी जागेवर असताना पथकाला यायला मात्र जवळपास २० मिनिटे लागली . पथक आल्या नंतर ६० फूट मार्गावरील २ बाकडे उचलण्यात आले . 

तर शिवसेना गल्ली नाक्यावर पालिका बस स्थानक लगत कपड्यांचे लागलेले बाकडे पाहून ते जप्त करण्यास कांबळे यांनी सांगितले . परंतु बाउन्सर व पथक प्रमुख मात्र तात्काळ कारवाई न करता टंगळमंगळ करू लागले . बाकडे वाले त्यांच्या समोरच कपड्यांचा माल गोळा करून लगतच्या दुकानात नेऊन ठेवत असताना देखील पथक बघ्याच्या भूमिकेत होते . ते पाहून प्रभाग अधिकारी देखील आश्चर्य चकित झाले. त्यातून काही माल आदी जप्त करून पथक निघून गेले . ह्या प्रकाराने फेरीवाला पथकांचे भ्रष्ट साटेलोटे शहराच्या मुळावर उठले असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. 

Web Title: The association of hawker teams of the municipality with the hawkers was revealed in the inspection of the ward officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.