उपवनच्या खाडीत आढळला मानसिक रुग्णाचा मृतदेह
By जितेंद्र कालेकर | Updated: September 19, 2024 21:28 IST2024-09-19T21:28:10+5:302024-09-19T21:28:32+5:30
त्याने आत्महत्या केली की, पाेहतांना बुडाला, याचा तपास करण्यात येत असल्याची माहिती वर्तकनगर पाेलिसांनी दिली.

उपवनच्या खाडीत आढळला मानसिक रुग्णाचा मृतदेह
ठाणे: ठाण्याच्या वर्तकनगर भागातील उपवन तलावामध्ये एका ४० ते ४५ वर्षीय मानसिक रुग्णाचा मृतदेह गुरुवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास आढळला. त्याने आत्महत्या केली की, पाेहतांना बुडाला, याचा तपास करण्यात येत असल्याची माहिती वर्तकनगर पाेलिसांनी दिली.
उपवन तलावामध्ये गणपती मंदिराजवळ एका अनाेळखी व्यक्तीचा मृतदेह मिळाल्याची माहिती ठाणे अग्शिशमन विभागाला मिळाली. त्याच आधारे घटनास्थळी वर्तकनगर पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे जवान हे आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या विभागासह दाखल झाले. या पथकांनी हा मृतदेह तलावामधून बाहेर काढला. काैटुंबिक कारणामुळे या व्यक्तीने तलावात उडी घेतल्याचा अंदाज पाेलिसांनी वर्तविला आहे.