सत्ताधाऱ्यांकडून देशातील नागरिकांना अच्छे दिनचे चित्र आजपर्यंत दिसले नाही; शरद पवारांचा हल्लाबोल

By सुरेश लोखंडे | Published: August 29, 2022 09:53 PM2022-08-29T21:53:28+5:302022-08-29T21:54:36+5:30

...आतापर्यंतचा अनुभव बघता, जे काही सांगितले ते १०० टक्के केंद्रातील सरकारकडून झालेले नाही. थोडे फार कमी अधीक झाले. पण देशाला अच्छे दिन आल्याचे चित्र नागरिकांना आजपर्यंतही दिसले नाही, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केंद्र सरकारवर केली आहे.

The citizens of the country have not seen the picture of Achhe Din from the rulers till date; Sharad Pawar's attack | सत्ताधाऱ्यांकडून देशातील नागरिकांना अच्छे दिनचे चित्र आजपर्यंत दिसले नाही; शरद पवारांचा हल्लाबोल

सत्ताधाऱ्यांकडून देशातील नागरिकांना अच्छे दिनचे चित्र आजपर्यंत दिसले नाही; शरद पवारांचा हल्लाबोल

Next

ठाणे : केंद्रातील सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी २०१४च्या निवडणुकीत अच्छे दिनची घोषणा केली होती. पण अच्छे दिनचे चित्र देशातील नागरिकांना आजपर्यंतही जाणवत नाही. त्यानंतरच्या २०२२ ला या अच्छे दिनचे विस्मरण होऊन सत्ताधाऱ्यांनी ‘न्यू इंडिया २०२२’ चे आश्वासन दिले. आता पुढील २०२४च्या निवडणुकीसाठी सत्ताधाऱ्यांनी देशाला 'फाईव ट्रिलीन इकोनॉमी’ करण्याचे  आश्वासन दिले. पण आतापर्यंतचा अनुभव बघता, जे काही सांगितले ते १०० टक्के केंद्रातील सरकारकडून झालेले नाही. थोडे फार कमी अधीक झाले. पण देशाला अच्छे दिन आल्याचे चित्र नागरिकांना आजपर्यंतही दिसले नाही, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केंद्र सरकारवर केली आहे.

राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या जिल्हा आढावा बैठकीसाठी पवार ठाण्यात आले होते. पक्षीय कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर त्यांनी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन केंद्रातील सरकार कसे अपयशी ठरत आहे, यावर भाष्य केले. यावेळी पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून, आपले नाव पुढे होण्याच्या शक्यतेसंदर्भात विचारली असता, पंतप्रधान पदासारखी कसलीही जाबबदार मी आता घेणार नाही. माझे वय आता ८२ वर्षाचे आहे. मोरारजी देसाई भाग्यवान होते. ते ८४ व्या वर्षी पंतप्रधान झाले. मोराजींचा कित्ता मी काही चालवू शकणार नाही. सामान्य माणसाच्या ज्या वेदना असतील जनतेच्या समस्यांची सोडणूक करण्याचे सूत्र माझ्याकडे असेल. असे पवार यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नास अनुसरून स्पष्ट करीत आपण पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत नसल्याचे स्पष्ट केले.

गुजरातमधील बिलकीस बानो प्रकरणाविषयी बोलताना ते म्हणाले की खालच्या कोर्टपासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंतच्या निकालामध्ये या घटनेतील लोकांना अजन्म करावासाची शिक्षा सुनावली आहे. पण पंतप्रधान मोदी ज्या राज्यातून येतात तेथील त्यांच्या विचाराच्या सरकारने निर्णय घेऊन या घटनेतील सर्व आरोपींची सुटका केली. एवढेच नाही तर त्यांचा सन्मान, सत्कार केल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. लालकिल्यावरील १५ आॅगस्टच्या भाषणात पंतप्रधानानंी देशातील स्त्रीयांच्या सन्मानाची भाषा केली आणि त्यांच्या राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून या लाजीरवाण्या घटनेतील आरोपींचा सत्कार केल्याची चित्र चिंताजणक असल्याचे त्यांनी सांगितले.

संसदेच्या लोकशाहीवर हल्ला होत असल्याचे या केंद्रातील सत्ताधाऱ्यांच्या भाजपा पक्षाकडून होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. लोकशाही मार्गाने निवडून येत सत्ता मिळवता येत नसल्याचे पाहून महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटक, मध्ये प्रदेश, आंध्र, ओरीसा आदी राज्यातील नॉन बिजेपी सरकारमधील लोकांना फोडून, त्यांना अमीश देऊन, सीबीआय, ईडी आदी यंत्रणांचा वापर करून सत्ता उलथवून टाकली जात आहे. हा संसदीय लोकशाहीवरील हल्ला आहे. 

गुजरात, आसाम या दोन राज्यातील सत्ता वगळता त्यांना लोकांनी सत्तेवर येऊ दिले नाही. लोकशाही मार्गाने निवडून येत सत्ता मिळवता येत नसल्यामुळे भाजपाने देशातील नॉन बीजेपी सरकार हटवण्यासाठी यंत्रणांचा वापर केला आहे. याप्रमाणेच राज्यातील उध्दव ठाकरे सरकार पडले असून त्यांच्याशी सुसंगत संवाद नसलेल्या राजकीय नेत्यांनाही त्यांनी त्या कारणाखाली अडकूवन तुरूंगात टाकले. यासाठी त्यांनी अनिल देशमुख्या यांच्या घरांवर, नातेवाईकांवर टाकलेल्या धाडींसह नवाब मलीक, खासजदार संजय राऊत यांचे उदाहरणेही यावेळी दिले.

देशातील भाजपा सरकारच्या विरोधात समविचारी पक्षांना एकत्र करून त्याविरोधात जनमत एकत्र करण्याच्या काळात गुलाम नबी यांनी कॉग्रेस पक्ष सोडला. पण हे चांगले झाले नाही. पार्लमेंटमधील ते माझे चांगले सहकारी आहे. ते भाजपाच्या भूमिकेविरोधात सतत आघाडीवर राहिलेले आहे. पण पक्ष सोडून जाण्यासाठी त्यांना काय संकट आले हे  माहित नसल्याचे पवार यांनी पत्रकारांना सांगितले. 

याशिवाय राज्या कोणावर कधी धाड पडणार, कधी जेलमध्ये जाणार हे भाजपच्या काही लोकांना कसे कळते यावरून काही तरी गडबड असल्याचेही त्यांनी सांगितले. रोहीत पवारांविषयी विचारलेल्या प्रश्नास अनुसरून त्यांनी भाजपात भविष्यवाणी वर्तवणार गट तयार झाल्याचे सांगितले.
 

Web Title: The citizens of the country have not seen the picture of Achhe Din from the rulers till date; Sharad Pawar's attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.