उल्हासनगरमध्ये पावसाळ्यापूर्वी होणाऱ्या कामांची आयुक्तांनी केली पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 06:52 PM2024-04-17T18:52:24+5:302024-04-17T18:56:14+5:30
उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त अजीज शेख यांनी शहरातील कैलाश कॉलनी, नेताजी चौक, भाटिया चौक, क.बी. रोड, अपला दवाखाना येथील सुरू ...
उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त अजीज शेख यांनी शहरातील कैलाश कॉलनी, नेताजी चौक, भाटिया चौक, क.बी. रोड, अपला दवाखाना येथील सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली.
यामध्ये प्रामुख्याने MMRDA/मुलभूत सेवा-सुविधा अंतर्गत सुरू असलेली रस्त्यांची कामे, पाणीपुरवठ्याची कामे, भुयारी गटार योजनेचे कामे, साफसफाई व बांधकाम विभागामार्फत सुरू असलेली इतर रस्ते व नाल्यांची कामे यांची प्रगती व त्या अनुषंगाने नागरिकांच्या असलेल्या तक्रारीची दखल घेऊनप्रत्यक्ष जागेवर जाऊन नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी महानगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, परमेश्वर बुडगे व इतर उपअभियंता, सार्वजनीक बांधकाम विभागाचे उपअभियंता तरुण सेवकानी, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, महानगरपालिकेचे प्रकल्प सल्लागार तसेच कामाचे कंत्राटदार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
धुळीचे प्रमाण कमी व्हावे, रहदारीस अडथळा निर्माण होऊ नये, तसेच कामाच्या ठिकाणी सुरक्षाविषयक उपाययोजना करणे, कामाची गुणवत्ता ठेवणे व कामाची गती वाढविणे तसेच काम चालू असतांना "सावधान काम सुरु आहे", असे फलक लावण्याचे महापालिका आयुक्वांनी संबंधितांना निर्देश दिले.