वडाळा-ठाणे मेट्रोच्या तीन पॅकेजचा खर्च ५०६ कोटींनी वाढला

By नारायण जाधव | Published: March 13, 2023 04:08 PM2023-03-13T16:08:24+5:302023-03-13T16:08:38+5:30

प्राधिकरणाच्या १६ फेब्रुवारी २०२३ रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त १३ मार्च २०२३ रोजी प्रसिद्ध झाले असून त्यात या वाढीव खर्चाचा तपशील दिला आहे.

The cost of three packages of Wadala-Thane Metro increased by 506 crores | वडाळा-ठाणे मेट्रोच्या तीन पॅकेजचा खर्च ५०६ कोटींनी वाढला

वडाळा-ठाणे मेट्रोच्या तीन पॅकेजचा खर्च ५०६ कोटींनी वाढला

googlenewsNext

नवी मुंबई : मूळ कंत्राटात नसलेल्या अनेक बाबींचा समावेश केल्याने आणि काही बाबी अचानक लक्षात आल्याने एमएमआरडीएच्या वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडली मेट्रो क्रमांक ४ च्या तीन पॅकेजच्या खर्चात ५०५ कोटी ८९ लाख २५ हजार ५६२ इतकी प्रचंड वाढ झाली आहे. यात पॅकेज क्रमांक ८ मध्ये १४२ कोटी १९ लाख ६७ हजार ६७७ रुपये, पॅकेज क्रमांक १० मध्ये १५२ कोटी ६८ लाख ६६ हजार ५३६ रुपये आणि पॅकेज क्रमांक १२ मध्ये २११ कोटी ९१ हजार ३५३ रुपये यांचा समावेश आहे.

प्राधिकरणाच्या १६ फेब्रुवारी २०२३ रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त १३ मार्च २०२३ रोजी प्रसिद्ध झाले असून त्यात या वाढीव खर्चाचा तपशील दिला आहे. पॅकज ८ चा वाढीव खर्च मेट्रो ४ च्या आधीच्या प्लॅननुसार मेट्रो मार्ग क्रमांक ११, ४, ४ अ आणि १० हे एकत्रित गृहीत धरले आहेत. त्यामुळे पहाटेच्या वेळेत मोघरपाडत्त कारशेडमधून काही मेट्रो गाड्या शिवाजी महाराज टर्मिनलपर्यंत रिकाम्या धावणे परिहार्य होते. ही अडचण लक्षात घेऊन भक्ती पार्क येथे साइड लाइन टाकणे गरजेचे आहे. त्यासाठी दोन ट्रॅक टाकण्यात येणार आहेत. त्याचा खर्च ३८ कोटी ८५ लाख ८ हजार ५९६ इतका आहे.

भक्तीपार्क मेट्रो स्थानक हे मोना रेल्वे स्थानकापासून १२ मीटर अंतरावर प्रस्तावित आहे. त्यामुळे तिथे दोन पाेर्टल पियर बांधण्याचे ठरले होते. परंतु, हे पियर कांदळवन क्षेत्रात येत आहेत. यामुळे कांदळवनांच्या संरक्षणासाठी भक्ती पार्क मेट्रो स्थानक दोन पोर्टल पियर ऐवजी एका कॅन्टिलिवर बांधण्याचे ठरले आहे. त्यासाठीचा खर्च ३८ कोटी ८५ लाख १९ हजार २७२ इतका आहे. तर वडळा मेट्रो स्थानक हे जीएसटी विभागाच्या जागेत येत आहे. या जागेवर जीएसटी भवन बांधण्यात येणार असल्याने हे स्थानक मोनो रेल्वे जवळ सरकावे लागणार होते. परंतु, मुख्यमंत्र्यांनी हे स्थानक आणि जीएसटी भवन एकत्रित बांधण्याचे सूचविले. यामुळे वडाळा स्थानक हे दोन ऐवजी तीन मजल्यांचे होणार आहे. ४९ कोटी ९५ लाख ९७ हजार ८४९ रुपयांनी वाढला आहे. ही तिन्ही कामे मिळून पॅकेज क्रमांक ८ चा खर्च १४२ कोटी १९ लाख ६७ हजार ६७७ रुपये इतका झाला आहे. या पॅकजची मूळ किमत ५४० कोटींपेक्षा हा वाढीव खर्च २६.३३ टक्क्यांनी जास्त आहे.

पॅकेज १० चा खर्च असा वाढला
पॅकेज क्रमांक १० नुसार या मार्गातील ३० पैकी १५ स्थानके ही पोर्टल तर १५ कॅन्टिलियर पद्धतीने बांधण्याचे प्रस्तावित होते. परंतु, गांधी नगर, नेव्हल हाऊसिंग आणि भांडुप महापालिका, सोनापूर ही स्थानके कॅन्टिलिवर प्रस्तावित केली आहेत. याशिवाय मेट्रो ४ व मेट्रो ६ या गांधीनगर जंक्शनवर एकत्र येतात. परंतु, मेट्रो ६ ने त्यांच्या कांजुरमार्ग सिस्टिमच्या सर्व खोल्या या गांधीनगर येथे एकत्र येतात. त्यामुळे चटईक्षेत्र वाढल्याने खर्च ४३ कोटी ३० लाख ६० हजार ६६ रुपये तर सेवा वाहिन्यांचे स्थलांतरण, वृक्षछाटणीसह इतर कामांचा खर्च ४२ कोटी १८ लाख ७२ हजार ६६८ रुपये इतका आहे. याशिवाय मेट्रो स्थानकांच्या प्रवेशाच्या मार्गात सेवा वाहिन्यांची स्थळ चाचणी झालेली नाही. त्यासाठी अतिरिक्त २६ कोटी ५८ लाख ३८ हजार ६०९ खर्च वाढणार आहे. ही सर्व रक्कम १५२ कोटी ६८ लाख ६६ हजार ५३६ रुपये इतकी असून मूळ कंत्राट ५१३ कोटींपेक्षा ती २९.७६३ टक्क्यांनी जास्त आहे.

पॅकेज १२ मध्ये भिवंडीच्या प्रवाशांना फायदा
मूळ कंत्राटात अंतर्भाव नसलेली परंतु, आता निकडीचे कामे म्हणून मेट्रो ४ च्या कापूरबावडी स्थानकापासून ५०० मीटर अंतरावर मेट्रो ५ चे स्थानक प्रस्तावित आहे. यामुळे मेट्रो ५ चे कापूरबावडी स्थानक वगळून ते मेट्रो ४ च्या कापूरबावडी स्थानकास जोडण्याचे ठरले आहे. यामुळे भिवंडीतील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. यासाठीचा वाढीव खर्च ५१ कोटी ३ लाख ९० हजार ४०९ इतका आहे.तर या एकत्रिकरणासाठी ७२० मीटर लांबीच्या मार्गिकेत बदल करावा लागणार आहे. त्यासाठी ४७ कोटी ९६ लाख ९१ हजार ३९५ इतका खर्च वाढला आहे.

तसेच घोडबंदर रस्ता हा जेएनपीटीसह गोवा आणि पुणेकडील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. येथील सातपैकी कापूरबावडी, मानपाडा, पाटलीपाडा आणि वाघबीळ या जंक्शनवर ४ उड्डाणपूल बांधून झालेले आहेत. आणखी आनंदनगर, भाईंदरपाडा आणि कासारवडवली असे तीन उड्डाणपूल प्रस्तावित असून त्यांचा खर्च ४४ कोटी ८९ लाख ६६ हजार ९८१ खर्च येणार आहे. पॅकेज १२ मधील वाढीव कामांची ही रक्कम २११ कोटी ९१ हजार ३५३ रुपये इतकी आहे. मूळ कंत्राटापेक्षा ती ४० टक्क्यांनी जास्त आहे.

Web Title: The cost of three packages of Wadala-Thane Metro increased by 506 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो