ढवळीने दिला गोकुळीला जन्म; मुके मातृत्व जिंकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2022 04:43 AM2022-04-24T04:43:18+5:302022-04-24T04:43:35+5:30
गेल्या सात दिवसांपासून ती एकाच जागी बसून आहे. त्यामुळे डॉक्टरांना बोलवणे गरजेचे होते.
विशाल हळदे
ठाणे : आठवडाभरापूर्वी खड्ड्यात पडून गंभीर जखमी झालेल्या शहापूर तालुक्यातील विहिगावच्या ढवळी गाईने शनिवारी सकाळी अकरा वाजता एका गोंडस वासराला (गाईला) जन्म दिला. तिचे नाव गोकुळी ठेवले आहे. जखमी ढवळीला तेलम कुटुंबीयांनी स्वतः बैलगाडी ओढत घरी आणल्याची बातमी ‘लोकमत’ने गेल्या आठवड्यात दिली होती. तिला मोठा प्रतिसाद लाभला होता.
शनिवारी सकाळी सोमनाथ तेलम यांनी वैद्यकीय कर्मचारी चौधरी यांना फोन केला. डॉ. सचिन म्हापणकर आणि डॉ. जयश्री दळवी यांनी जखमी ढवळीची प्रसूती केली. ढवळी पडल्यापासून तिच्या कमरेचे माकडहाड मोडले आहे. गेल्या सात दिवसांपासून ती एकाच जागी बसून आहे. त्यामुळे डॉक्टरांना बोलवणे गरजेचे होते. जन्मलेल्या गाईचे नाव गोकुळी ठेवण्यात आले आहे.