घरफोडी चोरी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला गुन्हे शाखेने केली अटक
By नितीन पंडित | Published: August 30, 2023 05:27 PM2023-08-30T17:27:54+5:302023-08-30T17:28:20+5:30
नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्याचा समांतर तपास भिवंडी गुन्हे शाखा करीत होते.
भिवंडी: तालुक्यातील गोदामात घरफोडी करून केमिकल पावडर चोरी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला अटक करण्यात भिवंडी गुन्हे शाखेला यश मिळाले असून घरफोडीतील शंभर टक्के मुद्देमालासह दोन टेम्पो पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती गुन्हे शाखेने बुधवारी दिली आहे.
पूर्णा ग्रामपंचायत हद्दीतील द्रोपदी छाया कंपाऊंड मधील ओमकार वेअर हाऊस येथे ५ जुलै ते ९ ऑगस्ट दरम्यान गोदामाच्या कुलपाची बनावट चावी बनवून गोदामात साठवलेला १४ लाख ४९ हजार ५०० रुपये किंमतीचा कास्टीक सोडा प्लॅक्स व मोनोसोडीयम ग्लुकोटामेट माल चोरी झाला होता.याप्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्याचा समांतर तपास भिवंडी गुन्हे शाखा करीत होते.
गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे दुर्गेश सबरजीत भारती वय २४ व राहुल गिरीजा सरोज वय २७ या दोघांना उत्तर प्रदेश राज्यातून ताब्यात घेत त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांचे इतर साथीदार उमेश दत्तात्रय पाटील वय २४, अमरदीप विलास बिराजदार वय २४,दोघे रा.चौधरी कंम्पाउंड,कामतघर, श्रीकांत गणपत देसाई वय ३०,रा.पापर्डे, ता. पाटण,जि.सातारा या तिघांनाही ताब्यात घेतले.त्यांनी घरफोडीतील चोरी केलेला मुद्देमाल गोदाम भाड्याने घेऊन तेथे साठवणूक करून ठेवल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी घरफोडीतील १४ लाख ४९ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमालासह चोरीसाठी वापरलेले २४ लाख रुपयांचे दोन टाटा टेम्पों असा ३८ लाखांचा एकूण मुद्देमाल जप्त केला आहे.
या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक विजय मोरे,प्रफुल्ल जाधव,धनराज केदार,पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे,रामसिंग चव्हाण,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रविंद्र पाटील,रामचंद्र जाधव,राजेश शिंदे, पोलिस हवालदार साबीर शेख,सुनिल साळुंके,सचिन साळवी,मंगेश शिर्के,रंगनाथ पाटील,देवानंद पाटील, प्रकाश पाटील,किशोर थोरात, शशिकांत यादव, पोलिस नाईक सचिन जाधव,भावेश घरत,सचिन सोनवणे,जालींदर साळुंखे, रोशन जाधव,प्रशांत बर्वे,महिला पोलिस हवालदार माया डोंगरे,श्रेया खताळ यांनी केला.