२८ वर्षांपासून फरार चोरट्यास गुन्हे शाखेने केली अटक; चोरीचे ३ गुन्हे दाखल

By धीरज परब | Published: June 26, 2024 08:01 PM2024-06-26T20:01:46+5:302024-06-26T20:01:55+5:30

जानेवारी १९९६ साली काशीमीरा पोलीस ठाण्यात चोरीचे ३ गुन्हे दाखल होते . त्यात एका गुन्ह्यात रोख १५ हजार , दुसऱ्या गुन्ह्यात १० हजार आणि तिसऱ्या गुन्ह्यात ५ हजार अशी रक्कम चोरीला गेली होती .

The crime branch arrested a thief on the run for 28 years | २८ वर्षांपासून फरार चोरट्यास गुन्हे शाखेने केली अटक; चोरीचे ३ गुन्हे दाखल

२८ वर्षांपासून फरार चोरट्यास गुन्हे शाखेने केली अटक; चोरीचे ३ गुन्हे दाखल

मीरारोड -  १९९६ साला पासून चोरीच्या ३ गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने अटक केली आहे . १९८८ ते २०२२ काळात त्याच्यावर १२ गुन्हे दाखल आहेत .  

जानेवारी १९९६ साली काशीमीरा पोलीस ठाण्यात चोरीचे ३ गुन्हे दाखल होते . त्यात एका गुन्ह्यात रोख १५ हजार , दुसऱ्या गुन्ह्यात १० हजार आणि तिसऱ्या गुन्ह्यात ५ हजार अशी रक्कम चोरीला गेली होती . गुन्ह्यातील महंमद खालीद मंहमद इस्माईल शेख, इजाज गुलाम शेख ह्या दोघा आरोपीना अटक केली गेली होती . तर मुख्य आरोपी रमेश ईश्वरलाल सोलंकी रा. मालाड, मालवणी, मुंबई हा मात्र पोलिसांच्या हाती सापडला नव्हता . 

मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे यांना सोळंकी याची माहिती मिळाली .  त्यानुसार उपनिरीक्षक विचारे सह हनुमंत सुर्यवंशी, आसीफ मुल्ला, संग्राम गायकवाड यांच्या पथकाने तांत्रीक विश्लेषण व गुप्त बातमीदार मार्फत मिळालेल्या माहीतीचे आधारे रमेश सोलंकी ( वय ५९ ) ह्याला दहीसर चेकनाका जवळ पेणकरपाडा मार्गावरून २४ जून रोजी सायंकाळी ताब्यात घेतले . सोळंकी ह्याला काशीमीरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले . 

सोलंकी हा पूर्वी पासूनच अट्टल चोरटा असून १९८८ ते २०२२ ह्या काळात त्याच्यावर भाईंदरचे नवघर व काशीमीरा सह मालाड , अंधेरी , कांदिवली , छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे पोलीस ठाणे  तसेच गुजरातच्या सुरत व वलसाड रेल्वे पोलीस ठाण्यात चोरीचे एकूण १२ गुन्हे दाखल आहेत . गर्दीचा गैरफायदा घेऊन सोळंकी हा खिशातील पाकीट वा हातातील बॅग मधील रोख , दागिने असा ऐवज चोरी करत असे . पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ , मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल राख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कारवाई केली . 

Web Title: The crime branch arrested a thief on the run for 28 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.