जिल्ह्याचा बारावीचा निकाल 3.77% घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2023 09:51 AM2023-05-26T09:51:07+5:302023-05-26T09:51:25+5:30

मुला-मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण झाले कमी : कल्याण ग्रामीणला मागे टाकून मुरबाडची सरशी

The district's 12th result fell by 3.77% | जिल्ह्याचा बारावीचा निकाल 3.77% घसरला

जिल्ह्याचा बारावीचा निकाल 3.77% घसरला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे जिल्ह्याचा गुरूवारी जाहीर झालेला बारावीचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत यंदा ३.७७ टक्क्यांनी घसरला. गेल्यावर्षी ठाणे जिल्ह्याचा निकाल ९२.६७ टक्के लागला होता यावर्षी ८८.९० टक्के निकाल लागला. त्यामुळे यंदा निकालात घट असल्याचे दिसून आले. गेल्यावर्षी बारावी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ६८२ ने कमी झाली. गेल्यावर्षी बारावीत उत्तीर्ण होणारे विद्यार्थी ८८ हजार ४३१ होते, यंदा ८७ हजार ७४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ठाणे जिल्ह्यातून गेल्यावर्षीपेक्षा यंदा जास्त विद्यार्थी परीक्षेला बसले होते. ९८ हजार ६९६ विद्यार्थ्यांनी यंदा बारावीची परीक्षा दिली होती गेल्या वर्षी ठाणे जिल्ह्यातील ९५ हजार ४२० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. 

यावर्षी ८७ हजार ७४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर गेल्यावर्षी ही संख्या ८८ हजार ४३१ इतकी होती. यावर्षी ५१ हजार ७९१ मुले परीक्षेला बसले होते त्यापैकी ४४ हजार ८९६ विद्यार्थीउत्तीर्ण झाले.

  गेल्यावर्षी यामध्ये ५० हजार ४७७  मुले परीक्षेला बसले होते त्यापैकी ४६ हजार २९६ मुले उत्तीर्ण झाले. 
  यावर्षी ४६ हजार ९०५ मुली परीक्षेला बसल्या होत्या त्यापैकी ४२ हजार ८५३ मुली उत्तीर्ण झाल्या, गेल्यावर्षी ही संख्या कमी होती. 
  गतवर्षी ४४ हजार ९४३ मुली परीक्षेला बसल्या होत्या त्यापैकी ४२ हजार १३५ मुली उत्तीर्ण झाल्या होत्या. गेल्यावर्षी मुलांचा निकाल ९१.७१ टक्के लागला तर मुलींचा निकाल  ९३.७५ टक्के लागला. 

यावर्षी मुलांचा निकाल 
८६.६८ टक्के 
तर मुलींचा निकाल
९१.३६ टक्के 
निकाल लागला. गेल्यावर्षीपेक्षा यंदा मुलांचा निकाल 
५.०३ 
टक्क्यांनी तर मुलींचा निकाल
२.३९
टक्क्यांनी घसरला. गेल्यावर्षी कल्याण ग्रामीण आघाडीवर होता. त्या भागाचा निकाल 
९५. ८० टक्के 
लागला होता. यंदा मुरबाडने आघाडी घेतली. मुरबाड मधील 
९६.८९ टक्के 
विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर यावर्षी कल्याण ग्रामीणचा निकाल
९१.४४ टक्के 
इतका लागला.

Web Title: The district's 12th result fell by 3.77%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.