दिव्यांग दाम्पत्याची समस्या ऐकण्यासाठी शिक्षणाधिकारी इमारतीचा जिना उतरले!

By सुरेश लोखंडे | Published: September 21, 2023 10:15 PM2023-09-21T22:15:03+5:302023-09-21T22:17:14+5:30

 या दिव्यांग दांपत्याची शैक्षणिक समस्या होती, त्याबाबत मदतीसाठी ते जिल्हा परिषद कार्यालयात आले होते.

The education officer went down the stairs of the building to listen to the problem of the disabled couple! | दिव्यांग दाम्पत्याची समस्या ऐकण्यासाठी शिक्षणाधिकारी इमारतीचा जिना उतरले!

दिव्यांग दाम्पत्याची समस्या ऐकण्यासाठी शिक्षणाधिकारी इमारतीचा जिना उतरले!

googlenewsNext

ठाणे : त्यांची समस्या सांगून त्यावर मात करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन घेण्यासाठी एक दिव्यांग दाम्पत्य ठाणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) भाऊसाहेब कारेकर यांच्या कडे आज आले. ते दिव्यांग असल्याचे कळताच ते स्वतः पहिल्या मजल्यावरुन खाली उतरून आले आणि त्यांची समस्या,तक्रार ऐकून घेत ती सोडवली. त्यामुळे या दाम्पत्याने त्यांचे आभार मानले.

 या दिव्यांग दांपत्याची शैक्षणिक समस्या होती, त्याबाबत मदतीसाठी ते जिल्हा परिषद कार्यालयात आले होते.  मात्र शिक्षणाधिकारी डॉ.कारेकर यांना ते शिक्षक दांपत्य अपंग असल्याचे माहीत असल्याने त्यांनी त्यांना खालीच थांबविले व ते स्वतःच त्यांची भेट घेण्यासाठी खाली आले. त्यांची समस्या व्यवस्थित समजून घेतली, आणि तात्काळ त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन करून त्यांची समस्या सोडविली देखील. 

 डॉ.कारेकर यांची ही संवेदनशीलता आणि कार्यतत्परता पाहून त्या अपंग दांपत्याचे हात आपोआप जोडले गेले आणि त्यांच्या तोंडून नकळत उद्गार आले... "साहेब.. आम्ही आपल्याला आयुष्यभर विसरू शकणार नाही.

सर्वच अधिकाऱ्यांनी अशी संवेदनशीलता जपली तर प्रशासन प्रशासन व्हायला वेळ लागणार नाही... चला तर मग संकल्प करू या. डॉ.कारेकर यांच्यासारखी कार्यतत्परता आणि संवेदनशीलता आपणही आपल्या कामात आणूया, अशी चर्चा बघ्यांसह जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्या कडून ऐकायला मिळाली.

Web Title: The education officer went down the stairs of the building to listen to the problem of the disabled couple!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.