... जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा कष्ट करण्याची जिद्द ठेवली पाहिजे -कपिल पाटील
By नितीन पंडित | Published: September 10, 2022 08:21 PM2022-09-10T20:21:38+5:302022-09-10T20:22:45+5:30
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सतत शेतीला शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध योजना राबवित आले आहेत - कपिल पाटील
भिवंडी - सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून अनेक योजना राबवत असताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा कष्ट करण्याची जिद्द अंगी बाळगली पाहिजे असे प्रतिपादन केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील यांनी केले.श निवारी ते भिवंडी पंचायत समिती सभागृहात शासनाच्या ठाणे कृषी विभाग व युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत मेरी पॉलिसी मेरे हात या कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे,पंचायत समिती सभापती सुरेंद्र भोईर,जिल्हा कृषी अधीक्षक दीपक खुटे, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे व्यवस्थापक हंसराज गंगवाल व मोठ्या संख्येने लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सतत शेतीला शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध योजना राबवित आले आहेत.पूर्वी ५० टक्के नुकसान झाले तरच विमा संरक्षण मिळत होत परंतु मोदी सरकारने ती मर्यादा कमी करून ३३ टक्क्यांवर आणून त्यासाठी संसदेत कायदा केला. देशातला शेतकरी हा सक्षम झाला पाहिजे आणि शेतकऱ्याला सक्षम करायचं असेल तर या सगळ्या योजनांचा लाभ शेतकऱ्याला देऊन त्याचे शेती उत्पन्न दुप्पट कसे करता येईल यासाठी केंद्र शासना कडून प्रयत्न केला जात आहेत.मात्र सरकारने केले म्हणजे आपली जबाबदारी संपली नसून शेतकऱ्याने अधिक कष्ट करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे ,पूर्वी आपल्या कडील शेतकरी भातशेती नंतर भाजीपाला पिकवून ती विक्री करत असल्याचे चित्र आपण पाहत होतो, पण आज आळसावलेल्या शेतकऱ्यांमुळे मुबंईसह ठाणे पालघर या राज्यातील २२ टक्के लोकसंख्या असलेल्या भागातील नागरिकांच्या गरजा पुणे कोल्हापूर नाशिक जळगाव अहमदनगर येथील शेतकरी पूर्ण करतात.त्यांना दोनशे ते अडीचशे किलोमीटर अंतरावरून आपल्या येथे आणून विक्री करणे परवडते मग आपल्याला का नाही परवडणार याचा विचार शेतकऱ्यांनी करण्याची गरज आहे.विमा संरक्षण मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळत असताना त्यासाठी शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविणे गरजेचे असून शेतकऱ्यांनी शेती पूरक व्यवसाय उभारावेत असे आवाहन कपिल पाटील यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमादरम्यान युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी यांच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी पैसे भरले आहेत त्यांना त्यांच्या विमा पॉलिसीचे मेरी पॉलिसी मेरे हात या अभियाना अंतर्गत वितरण करण्यात आले.