बापाने मुलासह घेतली धावत्या मेल समोर उडी; विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकावरील थरकाप उडवणारी घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 10:55 PM2022-02-16T22:55:54+5:302022-02-16T22:57:29+5:30
दुर्घटनेत गाडीची धडक बसल्याने प्रमोद यांचा जागीच मृत्यू झाला मात्र स्वराज ट्रॅक मधून बाहेर पडल्याने तो या अपघातात आश्चर्यकारकरीत्या बचावला.
विठ्ठलवाडी: मुंबई कडून पुण्याकडे जाणाऱ्या डेक्कन एक्सप्रेस समोर आपल्या मुलासह उडी मारून वडिलांनी आत्महत्या केल्याची घटना हृदयद्रावक घटना विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात घडली . या दुर्घटनेत वडिलांचा जागीच मृत्यू झाला असला तरी सहा वर्षाचा चिमुरडा मात्र या अपघातातून सुखरूप बचावला आहे.
उल्हासनगरच्या शांतिनगर परिसरात राहणारे प्रमोद आंधळे आपल्या सहा वर्षाचा मुलगा स्वराज सह आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास विठ्ठलवाडी स्थानकात पोहचले .विठ्ठलवाडी स्थानकातून मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या डेक्कन एक्सप्रेस या धावत्या मेल समोर प्रमोद यांनी मुला सह उडी मारली .
या दुर्घटनेत गाडीची धडक बसल्याने प्रमोद यांचा जागीच मृत्यू झाला मात्र स्वराज ट्रॅक मधून बाहेर पडल्याने तो या अपघातात आश्चर्यकारकरीत्या बचावला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्वराज ला बाहेर काढले तर प्रमोद यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात धाडण्यात आला आहे . प्रमोद यांनी आत्महत्या का केली याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले .