शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेले धान्य चोरणारी टोळी अटकेत

By अजित मांडके | Published: April 1, 2023 04:05 PM2023-04-01T16:05:51+5:302023-04-01T16:06:54+5:30

ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका टोळीला अटक केली आहे.

The gang that stole the grain grown by the farmers was arrested in thane | शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेले धान्य चोरणारी टोळी अटकेत

शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेले धान्य चोरणारी टोळी अटकेत

googlenewsNext

ठाणे :  काही दिवसांपूर्वीच हिंगोली आणि नांदेड येथील शेतकऱ्यांचे  धान्य चोरीच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका टोळीला अटक केली आहे. शफतउल्लाह चौधरी, हैदर शेख जमील मलीक आणि शेर खान अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून यातील तिंघांचा ताबा हिंगोली पोलिसांना देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

या संदर्भात भिवंडी तसेच राज्यातील इतर भागात घरफोडी करणाऱ्या टोळीतील काही सदस्य हे कल्याणफाटा येथे येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनीट एकला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीलीप पाटील यांनी साहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश काकड, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नरसिंग महापूरे,  पोलीस हवालदार राजेंद्र सांबरे, अनिल पाटील, अमोल देसाई, नामदेव मुंडे, बाळु मुकणे, शिपाई सागर सुरकळ, समीर  लाटे यांचे पथक तयार केले.

पथकाने सापळा रचून शफरतउल्लाह, हैदर आणि शेर खान यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांचा साथिदार जमील मलिक याचेही नाव समोर आले. त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. यातील शफरतउल्लाह, हैदर आणि शेर या तिघांविरोधात भिवंडी सह नांदेड, हिंगोली येथेही गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. दरम्यान काही दिवसांपूर्वीच हिंगोली आणि नांदेड येथील शेतकºयांच्या धान्य चोरीच्या घटना समोर आल्या होत्या. विधानसभेतही हा मुद्दा तारांकित प्रश्न म्हणून उपस्थित झाला होता. येथील हरभरा, सोयाबीनचा पोती चोरण्यात आरोपींचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. आरोपींविरोधात कारवाईसाठी तसेच पुढील तपासासाठी तिघांचा ताबा हिंगोली पोलीस घेणार आहेत. त्यानुसार ठाणे पोलिसांनी तशी कारवाई सुरु केली आहे.

Web Title: The gang that stole the grain grown by the farmers was arrested in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.