माती भराव प्रकरणी पालिका ठेकेदारास शासनाने ठोठावला ४५ लाखांचा दंड

By धीरज परब | Published: August 27, 2023 06:42 PM2023-08-27T18:42:27+5:302023-08-27T18:42:36+5:30

माती भराव करताना त्याची रॉयल्टी शासनास भरली नव्हती . 

The government imposed a fine of 45 lakhs on the municipal contractor in the case of soil filling | माती भराव प्रकरणी पालिका ठेकेदारास शासनाने ठोठावला ४५ लाखांचा दंड

माती भराव प्रकरणी पालिका ठेकेदारास शासनाने ठोठावला ४५ लाखांचा दंड

googlenewsNext

मीरारोड - शासनाच्या महसूल विभागाचे अपर तहसीलदार यांनी महापालिकेचा रस्ता बनवण्यासाठी विना रॉयल्टी माती भराव करणाऱ्या ठेकेदारास पाचपट दंडासह एकूण ४४ लाख ९४ हजारांचा दंड ठोठावला आहे . 

भाईंदर पश्चिमेच्या मीरा रुग्णालय ते माहेश्वरी भवन मार्गास जोडणाऱ्या विकास आराखड्यातील अर्धवट रस्ता बांधण्याची मागणी स्थानिक नगरसेवक सुरेश खंडेलवाल , डॉ . सुशील अग्रवाल व नागरिकांनी चालवली होती . खासदार राजन विचारे ,आमदार गीता जैन यांनी नागरिकांच्या आंदोलनात सहभागी होत पालिकेस तात्काळ रस्ता बांधून देण्यास सांगितले होते . 

त्यानुसार पालिकेने विकास आराखड्यातील सदर १८ मीटर रस्त्याचे कंत्राट मे २०२२ मध्ये मे. श्रीजी ईपीसी प्रा. लि. या ठेकेदारास दिले होते . त्याठिकाणी सखल भाग असल्याने ठेकेदाराने भराव करून रस्ता बांधला . मात्र माती भराव करताना त्याची रॉयल्टी शासनास भरली नव्हती . 

माहिती अधिकार कार्यकर्ते कृष्णा गुप्ता यांनी महसूल विभागास तक्रारी केल्यावर तलाठी भाईंदर यांनी ठेकेदाराने ४२४ ब्रास माती भराव बेकायदा केला असल्याचा अहवाल अपर तहसीलदार यांना डिसेंबर २०२२ मध्ये सादर केला . अपर तहसीलदार यांच्या कडे अनेक सुनावण्या झाल्या . विद्यमान अपर तहसीलदार निलेश गौंड यांनी  नुकताच ठेकेदारास  स्वामित्वधन चे २ लाख ५४ हजार ५०० रुपये व त्याचा पाच पट दंड मिळून  ४४ लाख ९४ हजार ४०० रुपयांचा दंड ठोठावला आहे . 

Web Title: The government imposed a fine of 45 lakhs on the municipal contractor in the case of soil filling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.