उल्हासनगर स्टेशनजवळील झोपड्या जमीनदोस्त; भरपावसात जाणार कुठे?, महिलांचा आक्रोश
By सदानंद नाईक | Published: August 23, 2022 05:47 PM2022-08-23T17:47:21+5:302022-08-23T17:53:45+5:30
उल्हासनगर महापालिकेने अवैध बांधकामावर पाडकाम कारवाई सुरू केल्याने, भूमाफियाचे धाबे दणाणले आहे.
उल्हासनगर - रेल्वे स्टेशन बाहेरील खुल्या जागेवरील अवैध झोपड्यावर महापालिकेने पाडकाम कारवाई केली. कारवाई बेघर झालेल्या नागरिकांनी भर पावसात लहान मुले घेऊन जायचे कुठे? असा टाहो फोडला आहे.
उल्हासनगर महापालिकेने अवैध बांधकामावर पाडकाम कारवाई सुरू केल्याने, भूमाफियाचे धाबे दणाणले आहे. मंगळवारी अवैध बांधकामावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त असतांना, अनेक अवैध बांधकामाची चर्चा रंगली होती. मात्र अतिक्रमण विभागाचे प्रमुख गणेश शिंपी यांच्या पथकाने रेल्वे स्टेशन जवळील खुल्या जागेवर उभ्या राहिलेल्या अवैध झोपड्यावर कारवाई दुपारी करण्यात आली. या कारवाईने अनेक नागरिक बेघर झाले.
भर पावसाळ्यात झोपड्यावर पाडकाम कारवाई केल्याने, पावसात लहान मुलांना घेऊन जायचे कुठे? असा टाहो महिलांनी फोडल्याने, वातावरण सुन्न झाले होते. तर यापुढे पुन्हा झोपड्या खुल्या जागेवर उभ्या राहिल्यास कारवाई करण्याचे संकेत सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिले.