ठाणे जि.प.च्या ‘जिल्हा पाणी व स्वच्छता‘चे महत्व ३० वकृत्व स्पर्धकांकडून उघड!

By सुरेश लोखंडे | Published: February 24, 2024 05:17 PM2024-02-24T17:17:48+5:302024-02-24T17:19:19+5:30

जिल्हा परिषदच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात या जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा पार पडल्या.

The importance of 'District Water and Sanitation' of Thane District revealed by 30 contestants! | ठाणे जि.प.च्या ‘जिल्हा पाणी व स्वच्छता‘चे महत्व ३० वकृत्व स्पर्धकांकडून उघड!

ठाणे जि.प.च्या ‘जिल्हा पाणी व स्वच्छता‘चे महत्व ३० वकृत्व स्पर्धकांकडून उघड!

ठाणे : पाऊस पाणी संकलन, पाणी आडवा पाणी जिरवा, जल हेच जीवन, माझ्या गावातील पाणी पुरवठा, पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण, जलसंवर्धन, पाण्याचे सुयोग्य वितरण व देखभाल दुरुस्ती आदी विषयांवर शालेय व महाविद्यालयीन तब्बल ३० विद्यार्थ्यानी आपापली मते मांडून या जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा रंगतदार ठरवल्या.

जिल्हा परिषदच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात या जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा पार पडल्या. जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशनव्दारे ‘जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष’ या विषयावर महाविद्यालयीन व विद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा आयाेजित केल्या. त्यात तब्बल ३० स्पर्धकांनी सहभाग घेऊन आपले म्हणणे परीक्षकांना पटवून दिले. त्यातून उत्कृष्ठ वकृत्व करणाऱ्या प्रथम, व्दितीय आणि तृतिय विजेत्यांची शुक्रवारी जिल्हा परिषदेने निवड करून त्यांचा सत्कार जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक पंडीत राठोड यांच्या हस्ते करण्यात आला.

पाच तालुक्यातील प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक पटकावलेले कनिष्ठ व वरिष्ठ गटातील ३० स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नाेंदवून या स्पर्धा रंगतदार ठरवल्या. कनिष्ठ व वरिष्ठ गटातील प्रथम क्रमांकास २१ हजारांचा धनादेश व पारितोषिक व प्रमाणपत्र, तर व्दितीय क्रमांकास ११ हजारांचा धनादेशाव्दारे पारितोषिक प्रमाणपत्र आणि तृतीय क्रमांकास पाच हजार ५०० धनादेशाव्दारे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन लवकरच सन्मानित करण्यात येणार असल्याचे राठोड यांनी सांगितले. यावेळी डॉ. प्रविण काळे, पी.व्ही.डी.टी. शिक्षणशास्त्र महिला विद्यापीठ मुंबईचे डॉ.अमोल उबाळे यांनी स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून उत्तम कामगिरी बजावली. या कार्यक्रमासाठी जिल्हा कार्यक्रम अधिकारी अनिल निचीते, प्रमिला सोनवणे. वैद्यही वेखंडे, सुरेखा त्र्यामणपाटी, संतोष निचीते, निलेश मोरे यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महत्त्वपुर्ण सहकार्य केले आहे.
 

Web Title: The importance of 'District Water and Sanitation' of Thane District revealed by 30 contestants!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे