लोखंडी पिंजरे काढून झाडांनी घेतला मोकळा श्वास
By अजित मांडके | Published: February 2, 2024 04:09 PM2024-02-02T16:09:28+5:302024-02-02T16:09:42+5:30
झाडा भोवती लावण्यात आलेल्या लोंखडी कुंपणांमुळे किंवा जाळ्यांमुळे वृक्ष वाढीला बाधा येत असते. तसेच काही वेळेस वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना देखील घडत असतात.
ठाणे : ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाच्या माध्यमातून आता झाडांभोवती लावण्यात आलेले कुंपण काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार माजिवडा - मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत घेण्यात आलेल्या विशेष मोहीमेत १६५ झाडांच्या खोडाभोवती असलेले लोखंडी पिंजरे काढून झाले मुक्त करण्यात आली आहेत.
झाडा भोवती लावण्यात आलेल्या लोंखडी कुंपणांमुळे किंवा जाळ्यांमुळे वृक्ष वाढीला बाधा येत असते. तसेच काही वेळेस वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना देखील घडत असतात. त्यामुळे याच्या विरोधात काही दक्ष नागरीकांनी आवाज उठविला होता. अखेर ठाणे महापालिकेने झाडांभोवती लावण्यात आलेल्या लोखंडी कुंपणे, जाळ्या काढण्याचे काम हाती घेतले आहे. त्यानुसार माजिवडा - मानपाडा प्रभाग समितीत विशेष मोहीम महापालिकेने हाती घेतली होती. त्यात १६५ झाडांसभोवती असलेले लोखंडी पिंजरे (ट्री गार्ड) कटरच्या सहाय्याने झाडांना कोणतीही इजा न होऊ देता काढण्यात आले. वृक्ष प्राधिकरणातर्फे ही मोहीम राबविण्यात आली.
कापूरबावडी ते गायमूख (घोडबंदर रस्ता डावी बाजू) - ३२
गायमुख ते कापूरबावडी (घोडबंदर रस्ता उजवी बाजू) - ७८
बाळकूम झ्र साकेत रोड - ५५
एकूण १६५ झाडांच्या खोडाभोवती असलेले लोखंडी पिंजरे काढून झाडे मुक्त करण्यात आली.