रिक्षात विसरलेली लॅपटॉप आणि महत्वाची कागदपत्राची बॅग पोलिसांनी प्रवाशाला केली परत

By अजित मांडके | Published: June 29, 2024 02:46 PM2024-06-29T14:46:52+5:302024-06-29T14:47:13+5:30

रिक्षा चालक राजेश कोकाटे यांच्या प्रामाणिकपण बघून कोपरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी कौतुक करून सत्कार केला.

The laptop and bag of important documents left behind in the rickshaw were returned to the passenger by the police | रिक्षात विसरलेली लॅपटॉप आणि महत्वाची कागदपत्राची बॅग पोलिसांनी प्रवाशाला केली परत

रिक्षात विसरलेली लॅपटॉप आणि महत्वाची कागदपत्राची बॅग पोलिसांनी प्रवाशाला केली परत

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : प्रवासात रिक्षा मध्ये राहिलेली लॅपटॉप आणि महत्वाची कागदपत्र असणारी बॅग विसरून गेलेली बॅग रिक्षा चालकाने प्रामाणिकपणा दाखवत कोपरी पोलीस ठाण्यात जमा केली. त्याचा प्रामाणिक पणा बघून पोलिसांनी रिक्षाचालकाचा सत्कार करून कौतुक केले.


कोपरी मध्ये रहाणारे आकाश खुपटे (२७) यांनी शुक्रवारी संध्याकाळी  घरी जाण्यासाठी ठाणे पूर्व रेल्वे स्टेशन येथून रिक्षा पकडली. सोबत लॅपटॉप अणि इतर कागदपत्राची महत्वाची बॅग सोबत होती. मात्र रिक्षात ही बॅग विसरून गेले. रिक्षा  चालक राजेश कोकाटे यांनी सहज पाठी बघितले तर एक बॅग राहिलेली दिसली. सदरची बॅग ही ज्यांची आहे त्यांच्याकडे जाणे महत्वाचे असल्याने. कोकाटे यांनी कोपरी पोलीस ठाणे गाठले. 


वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बॅग मधील कागद पत्रांचा आधार घेऊन आकाश खुपटे यांच्याशी संपर्क साधून लॅपटॉपची बॅग सुपूर्त केली. रिक्षा चालक राजेश कोकाटे यांच्या प्रामाणिकपण बघून कोपरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी कौतुक करून सत्कार केला.

Web Title: The laptop and bag of important documents left behind in the rickshaw were returned to the passenger by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे