भिवंडीत टोलेजंग इमारतीच्या लिफ्टने घेतला दोघांचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 08:33 AM2022-11-24T08:33:23+5:302022-11-24T08:35:44+5:30

शहरातील वंजारपट्टी मिल्लतनगर येथे टोलेजंग १४ मजली अंबर हाइट इमारतीचे बांधकाम सुरू आहे.

the lift of building took the lives of two In Bhiwandi | भिवंडीत टोलेजंग इमारतीच्या लिफ्टने घेतला दोघांचा जीव

भिवंडीत टोलेजंग इमारतीच्या लिफ्टने घेतला दोघांचा जीव

Next


भिवंडी : शहरातील मिल्लतनगर परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची लिफ्ट कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली आहे. जलालुद्दीन खान (वय २४) व ओमप्रकाश गौतम (वय ४१) अशी मृतांची नावे आहेत.

शहरातील वंजारपट्टी मिल्लतनगर येथे टोलेजंग १४ मजली अंबर हाइट इमारतीचे बांधकाम सुरू आहे. तेथे बुधवारी कामगार काम करीत असताना तळमजल्यावरून इमारतीच्या वरच्या मजल्यावर कामासाठी लिफ्टने जात हाेते. त्यावेळी सातव्या मजल्यावरून लिफ्ट थेट खाली कोसळली. या दुर्घटनेत या दाेन कामगारांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेनंतर इतर कामगारांनी जखमी कामगारांना सरकारी रुग्णालयात नेले; मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात उशिराने आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे निजामपुरा पोलीस ठाण्यात या घटनेप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असली, तरी कामगारांना कामाच्या ठिकाणी सुरक्षितता देण्यास तसेच कामगारांच्या सुरक्षिततेच्या हमीत कसूर केल्याने बांधकाम व्यावसायिक अथवा कंत्राटदारांवर गुन्हा दाखल होणार का?याकडे इतर कामगारांचे लक्ष लागले आहे.  

सुरक्षेकडे दुर्लक्ष
भिवंडीत सध्या अनेक इमारतींची बांधकामे सुरू असून व्यावसायिक स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कंत्राटदारांमार्फत, नाका कामगारांकडून इमारतींची कामे करून घेतात. मात्र या कामगारांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याची बाब या दुर्घटनेतून पुन्हा समोर आली. 

 

Web Title: the lift of building took the lives of two In Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.