मीरारोडच्या आलिशान एमआयसीएल गृहसंकुलात क्रिकेट वरून रहिवाश्यांमध्ये राडा
By धीरज परब | Published: November 18, 2024 10:20 PM2024-11-18T22:20:08+5:302024-11-18T22:22:09+5:30
मीरारोडच्या मुंबई - आमदाबाद महामार्गावर ठाकूर मॉल च्या मागे एमआयसीएल आराध्या हायपार्क हे आलिशान गृहसंकुल आहे .
धीरज परब, लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - मीरारोड मधील आलिशान व सुशिक्षित वस्तीच्या समजल्या जाणाऱ्या एमआयसीएल आराध्या हायपार्क ह्या गृहसंकुलात क्रिकेट वरून रहिवाशांमध्ये राडा झाला . त्यात एकाचे नाक व डोळा फ्रॅक्चर झालाय तर एकाचे दोन दात तोडल्या प्रकरणी एकमेकांच्या फिर्यादी वरून ९ रहिवाश्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
मीरारोडच्या मुंबई - आमदाबाद महामार्गावर ठाकूर मॉल च्या मागे एमआयसीएल आराध्या हायपार्क हे आलिशान गृहसंकुल आहे . सदर गृहसंकुलातील रहिवाश्यां मध्ये आपसात क्रिकेट प्रीमियर लीगचे संघ तयार करून त्यांचा व्हॉटसअप ग्रुप केला गेला होता .
येथील बी विंग मध्ये राहणारे रहिवाशी निखिल तुळशीदास जांबवलीकर ( वय ३९ ) यांनी काशीमीरा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिरुयादी नुसार , क्रिकेट लीगच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये चर्चे दरम्यान सुरेंद्र थांधिया यांनी तुमच्यात दम असेल तर खाली भेटण्यासाठी या असा संदेश टाकला .
निखिल हे क्रिकेटचा सराव करण्यासाठी गृहसंकुलाच्या आवारात आले असता थांधिया यांनी त्यांना शिवीगाळ सुरु केली . थांधिया यांनी निखिल यांना धक्का मारला असता ते लगत असलेल्या इम्रान अन्सारी ( वय ४९ ) यांच्या अंगावर पडले .
त्याचा राग येऊन इम्रान याने हातातील कड्याने निखिल यांना तोंडावर मारहाण सुरु केली . त्यात निखिल यांचे दोन दात तुटले व जखम झाली . तर थांधिया सह तेथे असलेले आशिष सावंत ( वय ४० वर्षे ) , युगांत कदम ( वय ३८ वर्षे ) आणि सोहेल सय्यद ( वय ४० वर्षे ) यांच्यासह थांधिया यांनी मिळून निखिल यांना लाथा बुक्क्याने मारहाण करून शिवीगाळ केली.
१७ नोव्हेम्बर रोजीच्या निखिल यांच्या फिर्यादी नंतर काशीमीरा पोलिसांनी सुरेंद्र थांधिया , इम्रान अन्सारी, आशिष सावंत, युगांत कदम व सोहेल सय्यद ह्या ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
त्या आधी सुरेंद्र थांधिया यांच्या फिर्यादी वरून चिराग सुतार , निखिल जांबवलीकर , प्रदीप घाडगे व उमेश नायर ह्या चौघांवर काशीमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता .
क्रिकेट प्रीमियर लीग वरून चिराग , निखिल , नायर व घाडगे ह्या चौघांनी थांधिया यांना ठोश्या बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली . मारहाणीत थांधिया यांच्या नाकाला व डोळ्याला जबर मार लागून फ्रॅक्चर झाले आहे .
पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत . सदर राड्या नंतर पुन्हा कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांनी रहिवाश्याना सार्वजनिक उपक्रम व कार्यक्रम तूर्तास करू नये असे बजावले आहे