उल्हासनगरात प्रहार जनशक्तीचे ठिय्या आंदोलन खोदलेल्या रस्त्याच्या दुरुस्ती बाबत पालिका अनभिज्ञ
By सदानंद नाईक | Published: February 20, 2024 07:03 PM2024-02-20T19:03:14+5:302024-02-20T19:03:24+5:30
उल्हासनगरात भुयारी गटार योजनेतून संपूर्ण शहरात रस्ते खोदून गटारीचे पाईप टाकण्यात येत आहे.
उल्हासनगर : भुयारी गटारीसाठी खोदलेल्या रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने, शहरातील प्रदूषणात वाढ झाल्याच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने धर्मवीर आनंद दिघे चौकात मंगळवारी ठिय्या आंदोलन केले. महापालिका उपायुक्त सुभाष जाधव यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले असून यावर लवकर तोडगा न काढल्यास आयुक्तांच्या दालनात पुढील आंदोलन करण्याचा इशारा पक्षाचे स्वप्नील पाटील यांनी दिला आहे.
उल्हासनगरात भुयारी गटार योजनेतून संपूर्ण शहरात रस्ते खोदून गटारीचे पाईप टाकण्यात येत आहे. गेल्या तीन महिन्यापासून रस्ते खोदून गटारीचे पाईप टाकण्यात येत आहे. मात्र खोदलेले रस्ते दुरुस्त केले नसल्याने, सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाले. यातून मुलांना व वृद्धांना श्वसनाचा त्रास होत असल्याचा आरोप विविध राजकीय पक्षाच्या वतीने केला आहे. शहराचे प्रदूषण सरासरी २०० च्या पुढे गेले असल्याने, नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाल्याचा आरोप प्रहार जनशक्तीचे प्रधान पाटील यांनी केला. महापालिकेच्या वतीने रस्त्याने मशिनद्वारे पाणी मारण्यात येते. मात्र तात्पुरत्या उपाययोजनेवर टीका होत आहे.
शहरात खोदलेल्या रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने, धुळीचे साम्राज्य निर्माण होऊन प्रदूषणात वाढ झाली. या निषेधार्थ प्रहार जनशक्तीचे स्वप्नील पाटील, प्रधान पाटील, सामाजिक संघटनेचे शैलेश तिवारी आदींच्या नेतृत्वाखाली धर्मवीर आनंद दिघे चौकात मंगळवारी ठिय्या आंदोलन केले. प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाल्याचा आरोप स्वप्नील पाटील यांनी केला. महापालिकेने याबाबत उपाययोजना केला नसल्यास, आयुक्त दालना घुसून आंदोलन करण्याचा इशारा दिली आहे.
चौकट
एमएमआरडीए सोबत चर्चा....उपायुक्त सुभाष जाधव
शहरात खोदण्यात आलेल्या रस्त्याची दुरुस्ती टप्प्याटप्प्याने केली जाणार असून याबाबत विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती महापालिका उपयुक्त सुभाष जाधव यांनी दिली आहे.
निकृष्ट कामाचा आरोप
शहराची लोकसंख्या ९ लाखा पेक्षा जास्त असून शहरात टाकण्यात येणारे भुयारी गटार पाईप अर्धा फूट, एक फूट व्यासाचे आहेत. इतक्या लहान आकाराच्या पाईपमधून इमारतीचा मैला व सांडपाणी जाणार का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. यापूर्वीचे गटार पाईप यापेक्षा मोठे असून गटारीचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाने केला. गटारीचे पाईप नव्याने टाकण्यात येत असून चेंबर मात्र जुनेच का? असा प्रश्नही नागरिक व्यक्त केला आहे.