ठाण्यात गोवर लसीकरण वाढविण्यासाठी पालिका घेणार धर्मगुरुंची मदत
By अजित मांडके | Published: November 29, 2022 05:08 PM2022-11-29T17:08:59+5:302022-11-29T17:10:16+5:30
ठाणे महापालिका हद्दीत आजच्या घडीला 54 जणांना गोवरची लागण झाल्याचे आढळून आले आहे.
ठाणे - गोवरला रोखण्यासाठी ठाणो महापालिकेने पावले उचलली असली तरी देखील ठाण्यातील काही भागातील नागरीकांमध्ये आजही गैरसमज असल्याचे दिसत आहे. लसीकरणाबाबत नागरीकांमध्ये अफवा असल्याने ते लसीकरणासाठी पुढे येत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता महापालिकेने यावर धर्मगुरुंची मदत घेण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार मुंब्रा व इतर काही भागात धर्मगुरुंच्या माध्यमातून जनजागृती करुन लसीकरण आणि सर्व्हेला सहकार्य करण्याचे आवाहन केले जात आहे.
ठाणे महापालिका हद्दीत आजच्या घडीला 54 जणांना गोवरची लागण झाल्याचे आढळून आले आहे. गोवरला रोखण्यासाठी महापालिकेने मुंब्रा व इतर भागात सर्व्हे सुरू केला आहे. मात्र मुंब्य्रात सर्व्हे करण्यासाठी जाणाऱ्या महापालिकेच्या पथकाला अतिशय वाईट अनुभव येत असल्याचे दिसून आले आहे. तोंडावर दरवाजा बंद करणे, लसीकरण आज नको उद्या या असे सांगून दुसऱ्या दिवशी घराला टाळे लावून बाहेर निघून जाणो असे काही प्रकार घडले आहेत. त्यामुळे सव्र्हे आणि लसीकरण करायचे कसे असा पेच महापालिकेच्या पथकांना सतावू लागला आहे.
आता यावर उपाय म्हणून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी आरोग्य विभागाला हाताशी धरुन या भागातील धर्मगुरुंची मदत घेण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार धर्मगुरुंच्या माध्यमातून येथील नागरीकांच्या मनात असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यानंतर लसीकरण आणि सव्र्हेची मोहीम वेगाने सुरु केली जाईल असे पालिकेने स्पष्ट केले आहे. तसेच येथीळ शाळांमध्ये देखील जनजागृती केली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. त्यानुसार शाळेतील शिक्षकांनी एखाद्या मुलाला ताप आला असेल तर त्याला लागलीच घरी पाठविणो गरजेचे असल्याचे पालिकेने सांगितले आहे. तसेच या विषयीची माहिती महापालिकेला कळविणो गरजेचे असल्याचे सांगितले आहे. कोरोना काळात देखील अशाच पध्दतीने महापालिकेने धर्मगुरुंची मदत घेतली होती. त्यानुसार त्यावेळेस ज्या पध्दतीने यश आले त्याच पध्दतीने आता देखील यश येईल असा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे.