आव्हाडांच्या ट्विटनंतर पालिकेला आली जाग; कळवा, दिवा परिसरातील अनाधिकृत बांधकामांवर कारवाई
By अजित मांडके | Published: December 7, 2022 06:00 PM2022-12-07T18:00:57+5:302022-12-07T18:02:34+5:30
कळवा भागातील अनाधिकृत बांधकामांसंदर्भात आव्हाड यांनी बुधवारी सकाळी ट्विट करीत या बांधकामांना पाठीशी घालणारे ब्रम्हा, विष्णु, महेश कोण असा सवाल उपस्थित केला.
ठाणे : कळवा भागात होत असलेल्या बेसुमार अनाधिकृत बांधकामांसंदर्भात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करीत महापालिकेचा समाचार घेतला. यानंतर, तत्काळ खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने बुधवारी कळवा, दिवा भागातील अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली. तसेच अनाधिकृत बांधकाम करणाऱ्यांच्या विरोधात एमआरटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले.
कळवा भागातील अनाधिकृत बांधकामांसंदर्भात आव्हाड यांनी बुधवारी सकाळी ट्विट करीत या बांधकामांना पाठीशी घालणारे ब्रम्हा, विष्णु, महेश कोण असा सवाल उपस्थित केला. त्यामुळे मागील काही दिवस या भागातील बांधकामांकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला अचानक जाग आली आणि त्यांनी तत्काळ या ट्विटची दखल घेत कळवा आणि दिव्यात अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास सुरवात केली आहे. महापालिकेकडे तक्रारी करुन वर्ष वर्ष कारवाई होत नसल्याची अनेक उदाहरणो ठाणोकरांनी पाहिली आहेत. किंबहुना पत्रची दखल देखील घेतली जात नाही. परंतु एका ट्विटची दखल घेत पालिकेने कारवाई केल्याचे आश्र्चय व्यक्त होत आहे.
ठाणो महापालिका कार्यक्षेत्नातील नऊ प्रभागसमित्यांमध्ये अनाधिकृत बांधकाम करणा:यांवर एमआरटीपीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अतिक्र मण विभागाला दिले आहेत. त्यानुसार प्रभागसमितील सहाय्यक आयुक्त यांच्यासोबत कारवाई करण्यात येणार असून कारवाईची मोहिम सुरू राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
बुधवारी अतिक्र मण विभागाचे उपायुक्त जी. जी. गोदेपुरे व अतिक्र मण विभागाचे समन्वयक महेश आहेर यांच्या उपस्थितीत कळवा आणि दिवा प्रभाग समितीतील अनाधिकृत बांधकामे पाडण्याची करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. कळवा, दिवा परिसरातील अनाधिकृत बांधकामांवर महापालिकेने हातोडा चालविला. प्रभाग समितीतील अनाधिकृत बांधकामावर कारवाईसोबत एमआरटीपीचे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचेही महेश आहेर यांनी नमूद केले.
परंतु एवढय़ा राजरोसपणो कळवा असेल किंवा दिवा, बाळकुम, ढोकाळी या भागात अनाधिकृत बांधकामे सुरु आहेत. त्याचे पुरावे देखील यापूर्वी पालिकेच्या अतिक्रमण विभागाला देण्यात आले आहेत. परंतु पुरावे दिल्यानंतरही पालिकेने कारवाई केल्याचे दिसून आले नाही. मात्र आव्हाडांनी एक ट्विट करताच अवघ्या काही तासात कारवाईला सुरवात झाल्याचे दिसून आले.