चिमुरडीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमाच्या बिहार येथून आवळल्या मुसक्या

By नितीन पंडित | Published: September 20, 2023 04:20 PM2023-09-20T16:20:46+5:302023-09-20T16:22:03+5:30

भिवंडी: सहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून निर्घृणपणे हत्या करून मृतदेह प्लास्टिकच्या बादलीत कोंबून फरार झालेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात ...

The murderer who tortured and killed the little girl, smiles from Bihar | चिमुरडीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमाच्या बिहार येथून आवळल्या मुसक्या

चिमुरडीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमाच्या बिहार येथून आवळल्या मुसक्या

googlenewsNext

भिवंडी: सहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून निर्घृणपणे हत्या करून मृतदेह प्लास्टिकच्या बादलीत कोंबून फरार झालेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात भिवंडी शहर पोलिसांना यश मिळाले आहे. पोलीस पथकाने बिहार राज्यात जाऊन आरोपी सलामत अंसारी वय ३२ यास अटक केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिले आहे.आरोपी सलामत अन्सारी हा भिवंडीत यंत्रमाग कारखान्यात बिगारी काम करीत होता.मयत चिमुरडी चॉकलेट खाण्यासाठी सलामत कडे पैसे मागत होती.त्यावेळी त्याने तिला खोलीत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची माहिती माहिती ढवळे यांनी यावेळी दिली.

 शहरातील फेणेगाव परिसरातील एका चाळीत राहणारी सहा वर्षीय चिमुरडी १३ सप्टेंबर रोजी हरवली होती.सायंकाळी उशिरा पर्यंत दिसून न आल्याने पालकांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.रात्री उशिरा चिमुरडीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध घेत असताना १५ सप्टेंबर रोजी चिमुरडी राहत असलेल्या परिसरात दुर्गंधी येत  असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरात शोध घेतला.

तेथील एक कुलूप बंद खोलीतून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी तपासणी केली असता त्या ठिकाणी अपहरण झालेल्या चिमुरडीचा मृतदेह आढळून आला होता.त्याच खोलीमध्ये मिळालेल्या पुराव्याचे आधारे आरोपीचे नाव सलामत असे निष्पन्न झाले होते.पोलिसांना तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी बिहार राज्यात पळून गेल्याची माहिती मिळाली.घटनेचे गांभीर्य ओळखून अपर पोलीस आयुक्त महेश पाटील,भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे,सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार,वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे यांच्या मार्गदर्शना खाली तीन पोलिस पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आली होती.

पोलीस निरीक्षक विजयकुमार कदम,पोलिस उपनिरीक्षक रविंद्र पाटील,कोलते,पोलिस हवालदार खाडे,राणे,पोलिस शिपाई भांगरे,गावीत,हरणे,ताटे,सोनावणे,पोलिस नाईक पवार,गवा,कोळी,कदम,पराड,नंदिवले या पथकाने बिहार राज्यातील मधुबनी जिल्ह्यातील 
नवादा या गावात वेषांतर करून पाळत ठेऊन संशयित सलामत अली आलम अन्सारी यास ताब्यात घेतले.त्याने गुन्हा केल्याचे कबुल केल्याने,आरोपीस स्थानिक न्यायालयाच्या परवानगीने भिवंडीत आणून अटक करण्यात आली असल्याची माहिती या पत्रकार परिषदेत ढवळे यांनी दिली आहे.

Web Title: The murderer who tortured and killed the little girl, smiles from Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.