ठाण्यात मतदारांची संख्या वाढली; १३ लाख ४६ हजार मतदार, १ लाख १७ हजार नवीन मतदार वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 10:17 AM2022-03-10T10:17:25+5:302022-03-10T10:17:41+5:30

कोरोनामुळे महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या. तसेच लोकसंख्येची गणनादेखील झालेली नाही. त्यामुळे २०११ चा निकष धरून तीच लोकसंख्या गृहीत धरावी, असे सांगण्यात आले आहे.

The number of voters in Thane has increased; 13 lakh 46 thousand voters, 1 lakh 17 thousand new voters have been added | ठाण्यात मतदारांची संख्या वाढली; १३ लाख ४६ हजार मतदार, १ लाख १७ हजार नवीन मतदार वाढले

ठाण्यात मतदारांची संख्या वाढली; १३ लाख ४६ हजार मतदार, १ लाख १७ हजार नवीन मतदार वाढले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे  महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे मतदारांमध्ये काहीशी भर पडणार असल्याचे दिसत आहे. सध्या महापालिका हद्दीत १ लाख १७ हजार नवीन मतदार वाढले असल्याची माहिती पुढे आली आहे. निवडणुका आणखी पुढे गेल्यास यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या १३ लाख ४६ हजार मतदारांची नोंद झाल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

कोरोनामुळे महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या. तसेच लोकसंख्येची गणनादेखील झालेली नाही. त्यामुळे २०११ चा निकष धरून तीच लोकसंख्या गृहीत धरावी, असे सांगण्यात आले आहे. त्यानुसारच प्रभागांची रचना करण्यात आली आहे. परंतु काही ठिकाणी म्हणजेच घोडबंदर, कळवा, दिवा आदी भाग हे मागील काही वर्षांत वाढले आहेत. त्यामुळे या भागातील काही प्रभाग मोठे झाले आहेत. 
भविष्यात पुन्हा लोकसंख्येची गणना झाल्यानंतर हे प्रभाग छोटे होऊन प्रभागांच्या संख्येत वाढ होईल. सध्या मात्र तसे चित्र दिसणार नाही. ठाणे महापालिकेच्या हद्दीत नव्या १ लाख १७ हजार मतदारांची वाढ झाल्याने २०२२ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांचा आकडा १३ लाख ४६ हजार इतका झाला आहे. मतदार वाढल्याने राजकीय पक्षांची चिंता वाढणार आहे. २०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार ठाणे महानगरपालिका हद्दीत १८ लाख ४१ हजार ४८१ इतकी लोकसंख्या नोंदवली गेली होती. आता ती तीस लाखांच्या आसपास पोहोचली आहे. २०१७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत १२ लाख २८ हजार ६०२ इतक्या मतदारांची नोंद होती. त्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ६ लाख ६७ हजार ५०४,  तर ५ लाख ६१ हजार ८७ इतक्या महिला मतदारांसह अवघ्या १५ अन्य मतदारांचा समावेश होता. 

 नेते मंडळींना फुटणार घाम
यंदाही मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात झाली. यामध्ये नव्याने नावे नोंदविणाऱ्यांच्या संख्येबरोबरच १८ वर्ष पूर्ण झालेल्या नव्या मतदारांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे महापालिका कार्यक्षेत्रात नव्या मतदारांची संख्या १ लाख १७ हजार  ३९४ इतकी वाढली आहे. वाढत्या मतदार संख्येमुळे सदस्य संख्या वाढली आणि प्रभागही वाढले आहेत. या वाढत्या मतदारांमुळे नेतेमंडळींना घाम फुटणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

Web Title: The number of voters in Thane has increased; 13 lakh 46 thousand voters, 1 lakh 17 thousand new voters have been added

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.