ठाणे जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या वाढतेय; मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिम
By अजित मांडके | Published: November 9, 2022 07:04 PM2022-11-09T19:04:21+5:302022-11-09T19:04:41+5:30
बेघर व भटक्या व विमुक्त जमातीतील मतदारांची नोंदणी, १० नोव्हेंबर रोजी ग्रामसभा आयोजित करुन मतदार यादीचे वाचन केले जाणार,
ठाणे : भारत निवडणुक आयोगाच्या सुचनेनुसार ठाणे जिल्ह्यातही आता नव मतदार नोंदणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार ३० सप्टेंबर २०२३ र्पयत ज्यांचे वय १८ वर्षे पूर्ण होणार आहेत. अशा मतदारांनी ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ या कालावधीत आयोजित मतदारयादीच्या विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रमादरम्यान आगाऊ मतदार नोंदणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली. तर ठाणो जिल्ह्यात सध्या ६१ लाख ३४ हजार ९५५ मतदारांची नोंद झाली असून त्यात पुरुष मतदारांची संख्या ३३ लाख २८ हजार ९ एवढी असून २८ लाख ६ हजार ९३ स्त्री मतदारांची नोंद झाली असून महिला मतदारांची संख्या वाढत आहे. तर संपूर्ण राज्यात ठाणो जिल्ह्यात सर्वाधिक ८५३ तृतीय पंथी मतदारांची नोंद झाली आहे. तसेच जिल्ह्यात ६ हजार ३९१ मतदान केंद्रे झाली असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
या पुनरिक्षण कार्यक्रम ९ नोव्हेंबर पासून सुरु होणार असून दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी ९ ते ८ डिसेंबर २०२२ असा आहे. विशेष मोहीम कालावधी ११ नोव्हेंबर २० नोव्हेंबर, ३ डिसेंबर आणि ४ डिसेंबर असा आहे. दावे हरकती निकालात काढण्याचा कालावधी २६ डिसेंबर र्पयत असणार आहे. अंतिम प्रसिध्दीसाठी आयोगाची परवानगी ३ जानेवारी २०२३ र्पयत असणार असून मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करणो ५ जानेवारी २०२३ ही असणार आहे. दुसरीकडे ठाणो जिल्ह्यात ३१ हजार ८७ दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली आहे. ठाणो जिल्ह्यात मतदारयादी विषयक काम करणारे मतदान केंद्र स्तरीय अधिकारी ५ हजार ५६९ कार्यरत आहेत. तर मतदार यादीत १०० टक्के मतदारांची छायाचित्रे असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात काही महत्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रीत
महिला मतदारांची नोंदणी - भिवंडी, पूर्व आणि पश्चिम, ऐरोली, बेलापुर या विधानसभा क्षेत्रत विशेष शिबिरांचे आयोजन केले जाणार. यासाठी महिला बचत गट, अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जाणार. ग्रामीण भागातील भिवंडी ग्रामीण, मुरबाड आदी ठिकाणी देखील विशेष शिबिर घेतले जाणार आहे.
युवा मतदारांची नोंदणी - जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघात १८ नोव्हेंबर रोजी ठाणो येथील बेडेकर कॉलेजमध्ये अशी होते मतदार नोंदणी या शिर्षकाखाली विद्याथ्र्याचा परिवसंवाद आयोजित केला जाणार.
बेघर व भटक्या व विमुक्त जमातीतील मतदारांची नोंदणी, १० नोव्हेंबर रोजी ग्रामसभा आयोजित करुन मतदार यादीचे वाचन केले जाणार, शहरी भागांसाठी मतदार नोंदणीमध्ये विशेष उपाय योजना केल्या जाणार, मतदार यादीतील तपशीलासोबत आधार क्रमांकाची जोडणी, राजकीय पक्षांचा सहभाग घेतला जाणार, मात्र २०२३ पासून जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या महिन्याच्या एक तारखेला किंवा त्या आधी ज्या नागरीकांची १८ वर्षे पूर्ण होतील त्यांना ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ या विशेष मोहीमेत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे.