Bhiwandi : भिवंडी न्यायालयात वकील महिलेचे फोटो काढणाऱ्या मानसिक विकृतास वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चोपले

By नितीन पंडित | Published: March 10, 2023 08:31 PM2023-03-10T20:31:11+5:302023-03-10T20:31:53+5:30

Bhiwandi News: भिवंडी न्यायालयात एका महिला वकिलाचे फोटो मोबाईलवर शूट करणाऱ्या विकृत तरुणास वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पकडून चोप दिला असल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे.

The office-bearers of the Lawyers' Association arrested the mentally deranged person who took pictures of a woman lawyer in the Bhiwandi court | Bhiwandi : भिवंडी न्यायालयात वकील महिलेचे फोटो काढणाऱ्या मानसिक विकृतास वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चोपले

Bhiwandi : भिवंडी न्यायालयात वकील महिलेचे फोटो काढणाऱ्या मानसिक विकृतास वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चोपले

googlenewsNext

- नितीन पंडित 
भिवंडी - भिवंडीन्यायालयात एका महिला वकिलाचे फोटो मोबाईलवर शूट करणाऱ्या विकृत तरुणास वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पकडून चोप दिला असल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे. विशेष म्हणजे या विकृत तरुणाचे मोबाईल जप्त केले असता त्याच्या मोबाईलमध्ये साठ हजार हून अधिक फोटो असून विविध ठिकाणच्या महिलांचे हजारो फोटो असल्याची बाब उघड झाली आहे.या विकृतास वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शांतिनगर पोलीस ठाण्यात नेत त्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

वकार अन्सारी वय ४५ वर्ष राहणार मिल्लत नगर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या विकृत तरुणाचे नाव आहे. त्याने शुक्रवारी दुपारी भिवंडी न्यायालयात एका महिला वकीलाचे फोटो मोबाईल मध्ये काढले होते.हि बाब महिला वकिलाच्या निदर्शनात येताच त्यांनी आपल्या वरिष्ठ वकिलांना याबाबत माहिती दिली.भिवंडी वकील संघटनेचे पदाधिकारी ऍड.मंजीत राऊत व ऍड.किरण चन्ने यांनी या विकृतास पकडून चोप दिला.व त्याचे मोबाईल जप्त केले असता त्याच्या मोबाईल मध्ये ६० हजारांहून अधिक फोटो असून विविध स्थानक व भागातील महिलांचे हजारहुन अधिक फोटो असल्याची बाब ऍड किरण चन्ने यांना समजताच त्यांनी या विकृतास आपल्या सहकारी वकीलांसह शांतीनगर पोलीस ठाण्यात नेऊन त्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

विशेष म्हणजे या विकृताने विविध भागातील महिलांचे एवढे फोटो का व कशासाठी काढले आहेत याचा तपास पोलीस करत असून या विकृतास कठोर शिक्षा करावी अशी मागणी एड. किरण चन्ने यांनी केली आहे.

Web Title: The office-bearers of the Lawyers' Association arrested the mentally deranged person who took pictures of a woman lawyer in the Bhiwandi court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.