आरोग्याच्या प्रश्नावर विरोधकांनी राजकारण करू नये- उद्योगमंत्री उदय सामंत

By अजित मांडके | Published: October 10, 2023 12:26 AM2023-10-10T00:26:03+5:302023-10-10T00:26:51+5:30

"नांदेड घटनेची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी विरोधकांनी सूचना असतील तर त्यांनी द्याव्यात"

The opposition should not play politics on the issue of health says Minister Uday Samant | आरोग्याच्या प्रश्नावर विरोधकांनी राजकारण करू नये- उद्योगमंत्री उदय सामंत

आरोग्याच्या प्रश्नावर विरोधकांनी राजकारण करू नये- उद्योगमंत्री उदय सामंत

googlenewsNext

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: नांदेड घटनेचे आम्ही समर्थन करत नाही. या घटनेप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. मात्र नांदेड रुग्णमृत्यू प्रकरणावर विरोधक राजकारण करत आहेत अशी टीका ही त्यांनी सोमवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केली.

नांदेड घटनेची पुनर्रावृत्ती होणार नाही. यासाठी विरोधकांनी सूचना असतील तर, त्यांनी द्याव्यात असे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले. एखादी घटना घडल्यानंतर राजकीय वळण देऊन बदनामी करणे योग्य नाही. आरोग्य व्यवस्थेत त्रुटी दिसत असतील तर पत्रकार परिषद घेऊन टिका करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी असे आवाहनही त्यांनी विरोधी पक्षाला केले. कोरोनाकाळात देशभरातील एकूण मृतांपैकी सुमारे ३० टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले होते. काही संस्थांनी केलेल्या अहवालात महाराष्ट्र सरकारचे कोरोनाकाळातील आरोग्य व्यवस्थेत काम कमी ठरले होते असे देखील ते म्हणाले.

आमदार मनिषा कायंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात जाण्यासंदर्भात एक वक्तव्य केले होते. केंद्रात राहायचे की राज्यात याबाबतचे हे सल्ले देणार आम्ही नाहीत. आमच्या प्रवक्त्यांनी घेतलेली भूमिका वयैक्तिक आहे. तसेच कोणतीही प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करा अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व प्रवक्त्यांना केल्या आहेत असेही त्यांनी सांगितले.

येत्या दोन ते तीन दिवसात राज्यातील मंत्रालयाच्या प्रत्येक विभागात एक वर्षांत चांगल्या कामाची माहिती पत्रकार परिषदेत लेखाजोख पत्रकारांसमोर मांडणार आहोत असेही त्यांनी सांगितले.

Web Title: The opposition should not play politics on the issue of health says Minister Uday Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.