प्रवाशांचा ‘सबुरीचा सल्ला’ चालकाने ऐकलाच नाही; एका हलगर्जीपणामुळे शेवटी नको ते घडलं...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 11:44 AM2023-01-14T11:44:17+5:302023-01-14T11:47:44+5:30

अनेक भाविक कुटुंबासह असल्यामुळे बसमधील वातावरण आनंददायी होते. चहापानासाठी एकदा बस थांबवण्यात आली.

The passengers advised the driver to drive slowly. But the bus driver did not hear him | प्रवाशांचा ‘सबुरीचा सल्ला’ चालकाने ऐकलाच नाही; एका हलगर्जीपणामुळे शेवटी नको ते घडलं...

प्रवाशांचा ‘सबुरीचा सल्ला’ चालकाने ऐकलाच नाही; एका हलगर्जीपणामुळे शेवटी नको ते घडलं...

Next

अंबरनाथ : अंबरनाथच्या मोरीवली गावातून १५ बस शिर्डीच्या दिशेने सोडताना रात्रीचा प्रवास असल्यामुळे प्रत्येक चालकाने गाडी सावधपणे चालवावी, अशी सूचना स्थानिकांनी केली होती. मात्र अपघातग्रस्त बसचा चालक सुरुवातीपासूनच अतिवेगाने बस चालवत असल्यामुळे प्रवाशांनी त्याला ‘सबुरीचा सल्ला’ दिला होता. मात्र प्रवासी झोपी गेल्यावर चालकाने पुन्हा वेग वाढवला आणि बसला अपघात झाला. 

अनेक भाविक कुटुंबासह असल्यामुळे बसमधील वातावरण आनंददायी होते. चहापानासाठी एकदा बस थांबवण्यात आली. पुन्हा बस सुरू करीत असताना प्रवाशांनी चालकाला ‘गाडी सबुरीने चालव’, असा सल्ला दिला. मात्र त्याने प्रवाशांचे ऐकले नाही. त्याच्या हलगर्जीमुळे बसला अपघात झाला. 

Web Title: The passengers advised the driver to drive slowly. But the bus driver did not hear him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.