रूमच्या गॅलरीमध्ये अडकलेल्या व्यक्तीची अग्निशमन दलाच्या जवानांनी केली सुटका 

By अजित मांडके | Published: July 19, 2024 10:44 AM2024-07-19T10:44:34+5:302024-07-19T10:44:58+5:30

रूमचा दरवाजा डोअर ब्रेकरच्या सहाय्याने तोडून गॅलरीमध्ये अडकलेल्या भोईर यांची सुखरूप सुटका केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.

The person stuck in the gallery of the room was rescued by the fire brigade personnel  | रूमच्या गॅलरीमध्ये अडकलेल्या व्यक्तीची अग्निशमन दलाच्या जवानांनी केली सुटका 

रूमच्या गॅलरीमध्ये अडकलेल्या व्यक्तीची अग्निशमन दलाच्या जवानांनी केली सुटका 

ठाणे - नौपाडा, या ठिकाणी असलेल्या अन्नपूर्णा या तळ अधिक ७ मजली इमारतीच्या सातव्या मजल्यावरील रूम क्रमांक ७०४ च्या गॅलरीत अडकलेले घरमालक अमोल भोईर (४३) यांची ठाणे महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी शुक्रवारी मध्यरात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास सुखरूप सुटका केली.

मध्यरात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास भोईर हे गॅलरीत अडकले असल्याची माहिती नौपाडा पोलीस कर्मचारी विजय देसाई यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. तातडीने नौपाडा पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दल या विभागांनी धाव घेतली. तसेच अग्निशमन दलाच्या जवानांकडून मध्यरात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास वाजताच्या सुमारास रूमचा दरवाजा डोअर ब्रेकरच्या सहाय्याने तोडून गॅलरीमध्ये अडकलेल्या भोईर यांची सुखरूप सुटका केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: The person stuck in the gallery of the room was rescued by the fire brigade personnel 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.