केंद्राच्या योजना तळागाळातील लाभार्थ्यांपर्यत पोहचण्यासाठी नियोजन करावे – डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

By प्रज्ञा म्हात्रे | Published: November 23, 2023 06:21 PM2023-11-23T18:21:35+5:302023-11-23T18:22:04+5:30

Thane News: ठाणे शासकीय योजनांचे लाभ लाभार्थ्यांपर्यत पोहचावेत यासाठी 'विकसित भारत संकल्प यात्रा' ही देशव्यापी मोहिम केंद्र शासनाकडून आखण्यात आली आहे.

The plans of the center should be planned to reach the beneficiaries at the grassroot level – Dr. Vinay Sahastrabuddha | केंद्राच्या योजना तळागाळातील लाभार्थ्यांपर्यत पोहचण्यासाठी नियोजन करावे – डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

केंद्राच्या योजना तळागाळातील लाभार्थ्यांपर्यत पोहचण्यासाठी नियोजन करावे – डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

- प्रज्ञा म्हात्रे
ठाणे - शासकीय योजनांचे लाभ लाभार्थ्यांपर्यत पोहचावेत यासाठी 'विकसित भारत संकल्प यात्रा' ही देशव्यापी मोहिम केंद्र शासनाकडून आखण्यात आली आहे. १५ नोव्हेंबरपासून सुरू झालेली ही' विकसित भारत संकल्प यात्रा' मोहिम २६ जानेवारी २०२४ पर्यत सुरु राहणार आहे. या मोहिमेतील सर्व योजना या तळागाळातील लाभार्थ्यांपर्यत पोहचाव्यात यासाठी ठाणे महापालिकेने महापालिका क्षेत्रातील तळागाळातील लोकांसाठी जनजागृती करणे, सोशल मिडीया उदा. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम या माध्यमातून या योजनांची माहिती पोहचविणे व यासाठी स्वयंसेवी संस्थांना सहभागी करुन घ्यावे असे केंद्र शासनास अभिप्रेत आहे.

गुरूवारी ठाणे महानगरपालिकेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष, माजी खा. डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, वर्षा दिक्षीत, परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे, उपनगरअभियंता विकास ढोले, घनकचरा विभागाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. राणी शिंदे, यांच्यासह ठाणे महापालिकेच्या विविध विभागाचे संबंधित अधिकारी व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या योजनांची माहिती करुन घेण्यासाठी आज ही बैठक आयोजित केली होती. या बैठकीत डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ही मोहीम देशभरात राबविली जाणार आहे. प्रत्येक गरजू भारतीय लाभार्थ्याचा शोध घेवून सर्व लाभार्थ्यापर्यंत केंद्र शासनाच्या योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ पोहोचविणे गरजेचे आहे.

या मोहिमेद्वारे प्रत्येक नागरिकाचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी सर्व स्तरांवरुन प्रयत्न केले जाणार आहेत. या योजनांमध्ये ठाणे महानगरपालिका अंतर्गतच्या 'पीएम स्वनिधी योजना, पंतप्रधान आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, पीएम ई- बस आणि अमृत योजना' आदी सुरू असलेल्या योजनांची सद्यस्थिती व माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. सद्यस्थितीत सोशल मिडीया हे नागरिकांपर्यत पोहचण्याचे प्रभावी माध्यम असल्याने विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेची माहिती व सहभाग घेण्याचे आवाहन जर फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून केले तर याचा फायदा नागरिकांना नक्की होण्यास मदत होणार आहे. तसेच सामाजिक क्षेत्रातही ठाणेकरांचे योगदान हे मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे या माध्यमातूनही जनजागृती करण्यात यावी असेही डॉ. सहस्त्रबुद्धे यांनी नमूद केले.

Web Title: The plans of the center should be planned to reach the beneficiaries at the grassroot level – Dr. Vinay Sahastrabuddha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे