वर्क फ्रॉम होमचे आमिष दाखवून फसवणूक केलेली पावणे सहा लाखांची रक्कम पोलिसांनी मिळवून दिली

By धीरज परब | Published: June 8, 2024 06:11 PM2024-06-08T18:11:34+5:302024-06-08T18:11:48+5:30

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील , पोलीस निरीक्षक  राहुल सोनावणे सह सचिन पाटील यांनी तपास करत झालेल्या व्यवहाराबाबत माहिती घेतली .

The police recovered the amount of 6 lakhs from Pavne who was cheated with the lure of work from home | वर्क फ्रॉम होमचे आमिष दाखवून फसवणूक केलेली पावणे सहा लाखांची रक्कम पोलिसांनी मिळवून दिली

वर्क फ्रॉम होमचे आमिष दाखवून फसवणूक केलेली पावणे सहा लाखांची रक्कम पोलिसांनी मिळवून दिली

मीरारोड - वर्कफ्रोम होमच्या कामात चांगले पैसे मिळतील असे आमिष दाखवून एसायबर लुटारूंनी  ८ लाख १५ हजारांना फसवले . त्यातील पावणे सहा लाख रुपये परत मिळवून देण्यात काशिगाव पोलिसांना यश आले आहे . 

 काशिगांव पोलीस ठाणे हद्दीतील मीरारोड परीसरात राहणारे, श्त्यागराज बांदेकर ( वय ४८ वर्ष )  यांना वर्क फ्रॉम होम नावाखाली ऑन लाईन यु-टुब व्हीडीओ लाईक , ऑनलाईन हॉटेल  - मुव्ही रेटींग व लाईक अथवा गुंतवणुक केल्यास अधिक नफा मिळविण्याचे आमिष अनोळखी सायबर लुटारूंनी ऑनलाईन दाखवले . या प्रकरणात ८ लाख १५ हजार  रुपयांची फसवणुक प्रकरणी तत्कालीन काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील , पोलीस निरीक्षक  राहुल सोनावणे सह सचिन पाटील यांनी तपास करत झालेल्या व्यवहाराबाबत माहिती घेतली . त्या माहितीच्या अनुषंगाने रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यात वळती झाल्याचे दिसुन आले.  पोलिसांनी ५ लाख ७५ हजारांची रक्कम गोठविण्या साठी संबंधीत बँकेसोबत पत्रव्यवहार करुन ती गोठवली . त्या नंतर ठाणे न्यायालया कडुन आदेश मिळवून गोठवलेली रक्कम बांदेकर यांच्या  खात्यावर परत वळती करण्यात आली आहे . 

Web Title: The police recovered the amount of 6 lakhs from Pavne who was cheated with the lure of work from home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.