सार्वजनिक बांधकाममंत्र्यांकडून ठाणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या समस्यांनी चाचपणी!
By सुरेश लोखंडे | Published: May 12, 2023 07:18 PM2023-05-12T19:18:44+5:302023-05-12T19:19:19+5:30
चव्हाण यांनी लोकप्रतिनिधींच्या अडचणी, समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिाकार्यांना र्देश दिले.
ठाणे : येथील जिल्ह्यातील लाेकप्रतिनिधीच्या समस्या समजून घेण्यासाठी व त्यावर उपाययाेजना करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम, अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज ठाणे जिल्हािधकारी कायार्लयात बैठक घेतली. यावेळी विविध समस्या व अडचणींवर चर्चा झाली. यावेळी बहुतांशी आमदारांसह ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे उपस्थित हाेते.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत चव्हाण यांनी लोकप्रतिनिधींच्या अडचणी, समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिाकार्यांना र्देश दिले. यावेळी आमदार निरंजन डावखरे, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) गोपीनाथ मुंडे, ठाणे महानगरपालिकेच अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे आदी उपस्थित होते.
यावेळी चव्हाण यांनी लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या समस्या, कामांसंदर्भात प्रशासनाने गतीने कार्यवाही करावी, असे निर्देश दिले. शासकीय नियमांमध्ये राहून कामे करून लोकप्रतिनिधींच्या कामांना गती देण्यासाठी गांभीर्याने लक्ष केंद्रीत करण्यावर चर्चा झाली. यास अनुसरून शिनगारे यांनी उपस्थित अिधकार्यांनाही मार्गदर्शन केले.