ठाणे पालिकेच्या शाळेची संरक्षण भिंत कोसळली

By अजित मांडके | Published: September 23, 2022 01:17 PM2022-09-23T13:17:30+5:302022-09-23T13:17:52+5:30

उर्वरित भिंत धोकादायक भिंतही पाडण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.

The protection wall of the school of Thane Municipality collapsed | ठाणे पालिकेच्या शाळेची संरक्षण भिंत कोसळली

ठाणे पालिकेच्या शाळेची संरक्षण भिंत कोसळली

Next

ठाणे : परबवाडी येथील ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक-१८ या शाळेची सुमारे ३५ फुट लांब व ०८ फूट उंच संरक्षण भिंत पडल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास समोर आली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नसून उर्वरित भिंत धोकादायक भिंतही पाडण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.

ठाणे,परबवाडी परिसरातील ज्ञानसाधना कॉलेज जवळ, शिवसेना शाखेच्या बाजूला असलेल्या ठामपा शाळेची संरक्षण भिंत पडल्याची माहिती कनिष्ठ अभियंता मनोज काळे यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षेला दिली. त्यानंतर, घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, उप-अभियंता व कनिष्ठ अभियंता (सार्वजनिक बांधकाम विभाग) यांनी धाव घेतली.

तसेच जेसीबी मशीनच्या सहाय्याने पडलेल्या भिंतीचे डेब्रिज बाजूला करण्याबरोबर धोकादायक झालेली भिंत पाडण्यात आली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.

Web Title: The protection wall of the school of Thane Municipality collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे