रस्ता महापालिकेची, पण वसूली नवरात्री आयोजकाची, मीरा-भाईंदरमधील प्रकार
By धीरज परब | Published: October 5, 2022 09:37 PM2022-10-05T21:37:30+5:302022-10-05T21:37:36+5:30
भाईंदर पश्चिमेच्या उड्डाण पूल खालून अग्निशमन केंद्रा कडे जाणाऱ्या रस्त्यावर लोटस नावाने ईस्ट वेस्ट फाउंडेशन ने नवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
मीरारोड - भाईंदर पश्चिमेच्या उड्डाणपूल खालून अग्निशमन दला कडे जाणाऱ्या महापालिकेच्या रस्त्यावर वाहन पार्किंग शुल्क मात्र नवरात्र आयोजकाच्या पावत्या देऊन वसूल केले गेल्याचा प्रकार समोर आला आहे . गरबा खेळण्यासाठी येणाऱ्या लोकां कडून मोठ्या प्रमाणात हि शुल्क वसुली केली गेल्याने गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी होत आहे .
भाईंदर पश्चिमेच्या उड्डाण पूल खालून अग्निशमन केंद्रा कडे जाणाऱ्या रस्त्यावर लोटस नावाने ईस्ट वेस्ट फाउंडेशन ने नवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी नवरात्रीचा येणाऱ्या वाहनांच्या मोठ्या संख्ये मुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत होती . या प्रकरणी लोकांनी संताप व्यक्त करत पुरेसा रस्ता , वाहन पार्किंग व वाहतूक नियोजनाची तरतूद केल्याची खात्री केल्या शिवाय पोलीस आणि महापालिका प्रशासन परवानग्या देतेच कशी ? असा सवाल करत कारवाईची मागणी होत आहे. तर राजकीय वा व्यावसायिक फायद्यासाठी कार्यक्रम आयोजित करणाऱ्यां मुळे वाहतूक समस्या गंभीर बनत असताना पोलीस कर्मचारी अश्या कार्यक्रमांच्या वाहतूक व्यवस्थे साठी लावणे चुकीचे असल्याची टीका होत आहे.
आता या ठिकाणी असलेल्या महापालिकेच्या सार्वजनिक रस्त्यांवर प्रति दुचाकी पार्किंग साठी ३० रुपये प्रमाणे लोटस नवरात्री नावाने पावत्या देऊन मोठ्या प्रमाणात बेकायदा पार्किंग शुल्क वसुली केली गेल्याचा प्रकार समोर आला आहे. महापालिकेच्या रस्त्यावर लोटस नवरात्रीच्या नावाने पार्किंग शुल्क कसे वसूल करता ? यावर लोटस नवरात्रीची पावती दाखवत आम्ही पगार वर आहोत आणि लोटस वाल्यांचे पार्किंग आहे असे तो व्यक्ती म्हणाला. दुचाकी साठी ३० रुपये आणि चारचाकी साठी ५० रुपये शुल्क घेत असून संदीप भाई आणि अकील भाई ने बोला आहे असे सुद्धा त्याने सांगितले . दुसऱ्या इसमाने देखील आम्ही पावती नुसार पैसे घेतोय असे म्हटले.
नवरात्रीसाठी येणाऱ्या लोकां कडून रस्ता पालिकेचा असताना पार्किंगच्या नावाने मोठ्या प्रमाणात लूट केली गेल्याचा हा प्रकार असून पार्किंग शुल्क वसूल करायला कोणी परवानगी दिली ? असा सवाल जागरूक नागरिक करत आहेत . या प्रकरणी पोलीस आणि पालिका संबंधितांवर गुन्हा दाखल करून आता पर्यंत वसूल केलेल्या पार्किंग शुल्काची रक्कम लोकांना परत करणार का ? असे प्रश्न केले जात आहेत.