घरात अडकलेल्या वृद्धेची सुखरुप सुटका; वृंदावर साेसायटीतील घटना

By जितेंद्र कालेकर | Published: September 26, 2023 08:47 PM2023-09-26T20:47:23+5:302023-09-26T20:47:59+5:30

अग्निशमन दलाचे मदतकार्य

The safe release of an old woman trapped in a house; Events in Vrindavar Society | घरात अडकलेल्या वृद्धेची सुखरुप सुटका; वृंदावर साेसायटीतील घटना

घरात अडकलेल्या वृद्धेची सुखरुप सुटका; वृंदावर साेसायटीतील घटना

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: वृंदावर साेसायटीमधील पहिल्या मजल्यावरील घराचा दरवाजा आतून लाॅक झाल्याने आत अडकलेल्या नमिता रक्षित (८६ वर्षे) या वृद्धेची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप सुटका केली. या महिलेला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने मंगळवारी दिली.

राबाेडीतील वृंदावन साेसायटीतील बिल्डिंग नं. २९/ए, पहिल्या मजल्यावरील रुम नं. १३ या नमिता रक्षित यांच्या घराचा दरवाजा लाॅक झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाला २६ सप्टेंबर राेजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास मिळाली हाेती. त्याच आधारे रुस्तमजी अग्निशमन केंद्राच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबविले. सदर घटनेत कोणालाही दुखापत नाही.

घटनास्थळी अग्निशमन दल तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी रूमच्या खिडकीच्या ग्रीलचे लॉक बोल्ड कटरच्या सहाय्याने तोडून घरामध्ये प्रवेश केला. त्यानंतर या रूमचा मुख्य दरवाजा उघडला.या रुममध्ये नमिता या एकट्याच रुममध्ये वास्तव्याला आहेत. त्या आजारी असल्यामुळे बेडवरून खाली पडल्या होत्या. त्यामुळे त्यांना दरवाजा उघडता येत नव्हता. त्यामुळे त्या या घरात अडकल्या हाेत्या, अशी माहिती सूत्रांनी िदली.

Web Title: The safe release of an old woman trapped in a house; Events in Vrindavar Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे