ठाणे महापालिकेवर जाणार समान महिला आणि पुरुष; तीन सदस्यीय पध्दतीने होणार निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 04:44 PM2022-05-31T16:44:15+5:302022-05-31T16:50:29+5:30

५० टक्के आरक्षणानुसार ७१ जागा या महिलांसाठी राखीव आहेत.

The same women and men will go to Thane Municipal Corporation; Elections will be held in a three-member system | ठाणे महापालिकेवर जाणार समान महिला आणि पुरुष; तीन सदस्यीय पध्दतीने होणार निवडणूक

ठाणे महापालिकेवर जाणार समान महिला आणि पुरुष; तीन सदस्यीय पध्दतीने होणार निवडणूक

Next

ठाणे- ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका या तीन सदस्यीय पध्दतीने होणार आहेत. मंगळवारी प्रभागांची आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीत प्रस्थापितांना कुठेही धक्का बसला नसल्याचे दिसून आले आहे. ठाणो महापालिकेने आगामी सार्वित्रक निवडणुकीसाठी महिलांसाठी राखीव आरक्षण सोडत जाहिर केली. 

यामध्ये अनुसुचित जातीसाठी ५, अनुसूचित जमातीसाठी २ आणि सर्वसाधारण खुल्या गटासाठी १७ जागा चिठ्ठ्या काढून महिलांसाठी निश्चित करण्यात आल्या. रक्षणाच्या या आकडेमोडीत तीन पॅनलच्या (अपवाद चार पॅनलचा प्रभाग ४२) एकूण ४७ प्रभागांपैकी २४ प्रभागांमध्ये प्रत्येकी दोन नगरसेविका निवडून येणार आहेत. असे असले तरी पालिकेवर ७१ महिला आणि ७१ पुरुष निवडून जाणार असल्याचे दिसत आहे.

डॉ. काशिनाथ घाणोकर नाट्यगृहात पालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या हातून चिठ्ठी काढत हे आरक्षण जाहिर करण्यात आले. ठाणे महापालिकेने आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली चिठ्ठ्या काढल्या गेल्या. यंदा त्रिसदस्य पॅनलपद्धतीने निवडणूक होणार असून १४२ नगरसेवक निवडून येणार आहेत. ५० टक्के आरक्षणानुसार ७१ जागा या महिलांसाठी राखीव आहेत. तर एकूण जागांपैकी अनुसूचित जातींसाठी १०, अनुसूचित जमातींससाठी ३ जागा राखीव आहेत. त्यातील महिलांच्या अनुसूचित जातींसाठी ५ व जमातींसाठी २ जागांचे पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात आरक्षण सोडत करण्यात आली. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक होणार असल्याने हा ‘कोटा’ सर्वसाधारण गटामध्ये वळवण्यात आला आहे. तर तिसऱ्या टप्यात महिलांच्या १७ जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. 

अनुसूचित जातींचे आरक्षण -
निवडणूक आयोगाने अनूसुचित जातींसाठी ३, १०,१२,१५,२३,२४,२७,२९,३४ आणि ३४ या प्रभागातील ‘अ’ जागा आरक्षित केल्या होत्या. त्यापैकी ३, १२,१५,२३ आणि २९ प्रभागातील ‘अ’ जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत.

अनुसूचित जमातींचे आरक्षण
अनुसूचित जमातींसाठी ५ अ, ६ अ आणि २९ ब हे प्रभाग निवडणूक आयोगोने थेट आरक्षित केले होते. त्यापैकी ५ अ आणि २९ ब हे दोन प्रभाग अनु. जमातीच्या महिलांसाठी राखीव झाले आहेत.

महिलांचा खुला प्रवर्ग
१४२ पैकी ७१ जागांवर महिला निवडून येणार आहेत.  ६४ जागा महिलांच्या सर्वसाधारण गटासाठी खुल्या आहे. त्यापैकी ४७ जागा थेट राज्य निवडणूक आयोगाने नेमून दिल्या होत्या. उर्वरित १७ जागांसाठी चिठ्ठीद्वारे महिलांच्या सर्वसाधारण गटासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यामुळे प्रभाग क्रमांक ४२ सह एकूण १८ प्रभागांमध्ये सर्वसाधरण प्रवर्गातील दोन नगरसेविका निवडून येणार आहेत. तर अनु. जाती, जमाती प्रवर्गासह ६ प्रभागांमध्ये दोन नगरसेविका निवडणून येणार आहेत.

Web Title: The same women and men will go to Thane Municipal Corporation; Elections will be held in a three-member system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.