शाळा मॉर्डन होणार, रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागही होणार हायटेक

By अजित मांडके | Published: February 8, 2023 03:58 PM2023-02-08T15:58:59+5:302023-02-08T15:59:07+5:30

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळांमध्ये प्रवेशासाठी रांगा लागाव्यात, जिल्हा रुग्णालयात देखील अत्याधुनिक शस्त्रक्रिया विभागांची सुविधा उपलब्ध व्हावी या दृष्टीने पावले उचलण्यात आली असल्याची माहिती ठाणो जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराजे देसाई यांनी दिली.

The school will be modernized, the surgical department of the hospital will also be hi-tech | शाळा मॉर्डन होणार, रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागही होणार हायटेक

शाळा मॉर्डन होणार, रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागही होणार हायटेक

Next

ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळांमध्ये प्रवेशासाठी रांगा लागाव्यात, जिल्हा रुग्णालयात देखील अत्याधुनिक शस्त्रक्रिया विभागांची सुविधा उपलब्ध व्हावी या दृष्टीने पावले उचलण्यात आली असल्याची माहिती ठाणो जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराजे देसाई यांनी दिली. त्यानुसार अत्याधुनिक शाळांची निर्मिती करण्याबरोबर अत्याधुनिक स्वरुपाच्या शस्त्रक्रिया विभाग तयार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी विविध विभागांच्या कामांचा आढावा घेतला. सांगली जिल्ह्यामधील जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या शाळांची अत्याधुनिक पद्धतीने उभारणी करण्यात आली असून या ठिकाणी विद्याथ्र्याना दर्जेदार शैक्षणिक सुविधा पुरविण्यात येत आहेत. त्यामुळे या शाळांमधील विद्याथ्र्याचा निकालाचा टक्का देखील सुधारला आहे. या शाळांमध्ये आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा यासाठी पालकांची गर्दी होत आहे.  

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या आणि नगरपालिकेच्या शाळा आहेत. या शाळांच्या नुतनीकरण तसेच इतर कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळतो. या निधीचा उपयोग शाळांची अत्याधुनिक पद्धतीने उभारणी करण्यासाठी होत नसल्याबाबत देसाई यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली. सांगली जिल्ह्याच्या धर्तीवर अत्याधुनिक शाळांची निर्मिती करण्यात आली तर, त्या शाळेतील विद्याथ्र्याचा शैक्षणिक दर्जा उंचावेल आणि या शाळांमध्ये पाल्यांचा प्रवेश घेण्याकडे पालकांचा कल वाढेल. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या शाळांची अत्याधुनिक पद्धतीने उभारणी करण्यात यावी, असे आदेश त्यांनी संबधींत विभागाला दिले. यंदा उपलब्ध झालेल्या निधीतून काही शाळांची अत्याधुनिक पद्धतीने उभारणी करावी आणि उर्वरीत शाळांची पुढच्या वर्षी प्राप्त होणा:या निधीतून अत्याधुनिक पद्धतीने उभारणी करावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

दुसरीकडे, जिल्ह्यात तीन जिल्हा रु ग्णालये, एक महिला रु ग्णालय, चार उपजिल्हा रु ग्णालय, सहा ग्रामीण रु ग्णालये आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णांना तालुक्याच्या ठिकाणीच आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी या रु ग्णालयांची उभारणी करण्यात आलेली आहे. असे असले तरी याठिकाणी शस्त्नक्र ीया विभाग नसल्यामुळे रु ग्णांचे हाल होत होते. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. कैलास पवार यांनी ठाणे, भिवंडी आणि शहापूर या ठिकाणी अत्याधुनिक शस्त्नक्र ीया विभागाची उभारणी केली. त्यापाठोपाठ मुरबाड, गोवेली, बदलापूर, अंबरनाथ या रुग्णालयामध्येही अशाचप्रकाराचा विभाग तयार करण्याचे काम सुरु  आहे. उर्वरीत खर्डी आणि टोकावडे भागात मात्न हे काम प्रस्तावित होते.

बुधवारी झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत हा विषय पटलावर येताच पालकमंत्नी देसाई यांनी अत्याधुनिक शस्त्रक्रिया विभागाच्या कामांचा घेऊन खर्डी आणि टोकावडे येथे देखील अशाच प्रकारच्या सुविधा उपलब्ध देण्याचे आदेश दिले.

Web Title: The school will be modernized, the surgical department of the hospital will also be hi-tech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे