भिवंडीतील मजूर दाम्पत्याच्या मुलाचा गुजरातमध्ये लागला शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 04:45 PM2022-04-06T16:45:43+5:302022-04-06T16:46:03+5:30
चाईल्ड प्रोटेक्शन युनिटची कामगिरी: पालकांच्या केले स्वाधीन
ठाणे: भिवंडीतील खंडाळपाडा येथून बेपत्ता झालेल्या दहा वषीर्य मुलाचा गुजरातमधील गांधीनगर येथून शाेध घेण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या चाईल्ड प्रोटेक्शन युनिटला यश आले आहे. त्याला सुखरुपपणे बुधवारी आई वडिलांच्या स्वाधीन केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी दिली.
गुजरातमधील अहमदाबाद येथील कालूपूर रेल्वे सनकामध्ये पालक नसलेल्या अवस्थेमध्ये ५ मार्च २०२२ रोजी दहा वर्षीय भावेश राठोड हा मुलगा मिळाला असून त्याला गांधीनगरच्या सरकारी बालगृहामध्ये ठेवल्याची माहिती या बालगृहाच्या अधिकारी नीलम भावसार यांच्याकडून ३० मार्च २०२२ रोजी ठाणे पोलिसांना दिली. ठाणे जिल्हयातील कल्याण बायपास रोड येथील शंकर मंदिराजवळ वास्तव्यास असल्याची माहिती विचारपूस केल्यानंतर त्याने दिल्याचेही भावसार यांनी सांगितले. पोलीस पथकाच्या मदतीने त्याच्या पालकांचा शोध घेण्यात यावा, असेही त्यांनी कळविले. त्यानुसार ठाणे चाईल्ड प्रोटेक्शन युनिटचे पोलीस उपनिरीक्षक संदीप खाडे, जमादार एस. एन. जाधव, हवालदार एस. आर. साळवी, एस.टी. चौधरी, एस. व्ही. दोंदे, जमादार व्ही. पी. वेंगुर्लेकर आदींच्या पथ्रकाने भावेश याच्या कल्याण बायपास रोडवरील खंडाळपाडा, आदीवासी पाडयात त्याच्या पालकांचा शोध घेतला.
तेंव्हा भिवंडीतील भादवड गावातील प्रकाश धेंडे यांच्या चाळीतील रहिवासी मंजू राठोड (३२) आणि ललीता राठोड (२८) हेच त्याचे पालक असल्याची माहिती समाेर आली. त्यानुसार त्यांच्या व्हिडीओ कॉलद्वारे भावेशची भेट घडवून आणली. तेंव्हा तो आपलाच मुलगा असल्याचे राठोड दाम्पत्याने ओळखले. शाळेच्या इतर कागदपत्रांच्या आधारे त्याची कागदाेपत्री ओळखही पटविण्यात आली. त्यानंतर गुजा्रातमधील गांधीनगरच्या बाल कल्याण समितीच्या अधिकाा्र्यांच्या परवानगीने भावेश याला मंगळवारी पालकांच्या ताब्यात देण्यात आले. ताे गुजराथमध्ये कसा गेला, याची माहिती मात्र ताे सांगू शकला नसल्याचे पाेलिसांनी सांगितले.