मुंबई-नाशिक दरम्यान दाेन मार्गिका बंद ठेवणार, महामार्गावर रात्री करणार दुरुस्तीचे काम 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 06:03 AM2023-08-29T06:03:07+5:302023-08-29T06:03:18+5:30

साकेत पुलाची तात्पुरती दुरुस्ती केली असून, हा पूल वाहतुकीसाठी खुला केला आहे.

The southbound lane will be closed between Mumbai and Nashik, repair work will be done on the highway at night | मुंबई-नाशिक दरम्यान दाेन मार्गिका बंद ठेवणार, महामार्गावर रात्री करणार दुरुस्तीचे काम 

मुंबई-नाशिक दरम्यान दाेन मार्गिका बंद ठेवणार, महामार्गावर रात्री करणार दुरुस्तीचे काम 

googlenewsNext

ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या महामार्गाच्या चार महामार्गिकांपैकी दोन बंद करून रात्रीच्या वेळी काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.  त्यामुळे वाहतुकीवर फारसा परिणाम होणार नसल्याचे ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी सांगितले.
दिव्यांगाच्या गरजा समजून त्यांना योजनांचा लाभ करून देण्यासाठी १ सप्टेंबर रोजी येथील शिवसमर्थ हायस्कूलमध्ये दिव्यांग मेळावा घेणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले. 

 साकेत पुलाची तात्पुरती दुरुस्ती केली असून, हा पूल वाहतुकीसाठी खुला केला आहे. या पुलाची काही दिवसांनी पूर्ण दुरुस्ती करण्यात येणार असल्याचेही शिनगारे यांनी स्पष्ट केले.

 ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते, महिला बालकल्याण अधिकारी  संजय बागूल आदी अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील तीन लाख ३१ हजार ६२४ दिव्यांग या मेळाव्याचा लाभ घेणार आहेत.

Web Title: The southbound lane will be closed between Mumbai and Nashik, repair work will be done on the highway at night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे